घरमुंबईठाण्यात राष्ट्रवादीचे सरकारविरोधात ढोल बजाओ आंदोलन

ठाण्यात राष्ट्रवादीचे सरकारविरोधात ढोल बजाओ आंदोलन

Subscribe

भाजपप्रणीत सरकारच्या काळात वाढलेल्या बेरोजगारीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाण्यात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं.

केंद्रातील मोदी सरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नवीन रोजगार देण्याचे बाजूलाच राहिले. पण कंपन्या बंद पडून आहे तो रोजगार जाऊ लागला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ढोल बजाओ सरकार को जगाओ आंदोलन केले. यावेळी ढोल ताशांचा गजर करीत सरकारचा निषेध केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे-नवी मुंबई प्रभारी अभिषेक बोके, ठाणे शहराध्यक्ष मोहसीन शेख, कार्याध्यक्ष संदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर ढोल ताशांचा गजर करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन सादर करण्यात आले.


हेही वाचा – किती जणांचे बळी गेल्यानंतर सरकारला जाग येणार-राष्ट्रवादी

‘तर वर्षावर ढोल वाजवायला कमी करणार नाही’

‘बेरोजगारांना या सरकारने रोजगार दिलेला नाही. आज बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील १ लाख ४२ हजार कंपन्या बंद पडल्या आहेत. यावरुन हेच लक्षात येते की नवीन रोजगार सोडा, पण अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. म्हणून या बेरोजगारीच्या विरोधात आम्ही सातत्याने आंदोलने करतोय. पण, हे फडणवीस सरकार कुंभकर्णाच्या झोपेत आहे. अणि या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी आम्ही ढोल वाजवतोय. आज आम्ही ठाण्यात ढोल वाजवलेत. जर, तत्काळ रोजगारनिर्मिती केली नाही तर आम्ही वर्षा बंगल्यावर येऊन ढोल वाजवायला मागे पुढे पाहणार नाही,’ असा इशारा प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसच्या या आंदोलनात मोठ्या संख्येने युवा सामील झाले होते. फडणवीस सरकार आणि भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी बूट पॉलिश, छत्री दुरुस्ती, चणेवाला अशा नानाविध भूमिका साकारुन भाजपा सरकारवर टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -