घरमनोरंजनबिग बॉसच्या घरात 'एक डाव भुताचा' हे साप्ताहिक कार्य सोपविले

बिग बॉसच्या घरात ‘एक डाव भुताचा’ हे साप्ताहिक कार्य सोपविले

Subscribe

'एक डाव भुताचा' हे साप्ताहिक कार्य पुढच्या आठवड्याच्या कॅप्टन्सीच्या उमेदवार निवडण्याकरिता देण्यात आला आहे.

बिग बॉसच्या घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कमध्ये फक्त शिव सेफ होऊन बाकी सगळे सदस्य नॉमिनेट झाले. काल बिग बॉसच्या घरात ‘एक डाव भुताचा’ हे साप्ताहिक कार्य सोपिवले आहे. हे कार्य कॅप्टन्सीसाठी खेळले जाणार आहे. या कार्यात दोन टीम निवडल्या असून एका टीममध्ये अभिजीत, वैशाली, विणा आणि शिव तर दुसऱ्या टीममध्ये नेहा, माधव, हिना आणि रुपाली आहे. या साप्ताहिक कार्याची संचालिका किशोरी शहाणे विज आहे. पहिल्या दिवशी भूताची टीम ही अभिजीत, वैशाली, विणा आणि शिव यांची आहे. तर शिकारींची टीम ही नेहा, माधव, हिना आणि रुपाली आहे.

या साप्ताहिक कार्यात नक्की आहे तरी काय?

या कार्यात भूत बनलेल्या स्पर्धकांच्या नावाच्या बाहुल्या शिकारी असलेल्या टीमने लपवायचे होत्या. एका बंद असलेल्या खोलीत भुतांच्या डोळ्यावर पट्टी बांधायची होती. बजर झाल्यानंतर ती डोळ्यावरची पट्टी काढून भुत असलेल्या स्पर्धकाला आपल्या नावाच्या बाहुल्या शोधायच्या होत्या. बाहुली मिळताच क्षणी एक भिंत ओलांडून दुसऱ्या बाजूला सेफमध्ये जायचं आहे. जेव्हा किंचाळी व्हायचा आवाज येईल तेव्हा जो सदस्य भिंत ओलांडलेला नसेल तो सदस्य पुढच्या आठवड्यात कॅप्टन्सी रेसमधून बाहेर होईल.

- Advertisement -

या कार्यात नेहाने शिवला बाहुली शोधण्यासाठी मदत केली. तसेच रुपालीने देखील विणाला मदत करताना दिसली. काल या कॅप्टन्सीच्या स्पर्धेतून वैशाली बाहेर पडली आहे. आजच्या भागात नेहा शिवला पटवण्याचा प्रयत्न करत आहे की, काल मी तुला मदत केली आज तू मला मदत कर. पण अभिजीत आणि टीमचे ठरले आहे. कोणत्याही प्रकारची मदत नेहाला करायची नाही. आता येणाऱ्या भागात शिव नेहाची मदत करणार की नाही हे कळेलं.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -