घरमुंबईनारळाच्या झाडाखाली उभं राहू नका; हॉस्पिटलात जावं लागेल!

नारळाच्या झाडाखाली उभं राहू नका; हॉस्पिटलात जावं लागेल!

Subscribe

झाडावरचा नारळ अंगावर पडल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे.

मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याचे प्रकार अनेक प्रकार घडल्याचं आपण ऐकतो. त्यामध्ये अनेक ठिकाणी झाड अंगावर पडल्यामुळे नागरीक जखमी झाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. मात्र, एका नारळाच्या झाडावरचा नारळ अंगावर पडल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना कल्याणात घडली. तबस्सुम सलमानी असे या महिलेचे नाव असून, सुदैवाने हा नारळ त्यांच्या डोक्यावर न पडता कानावरून खांद्यावर पडला. त्यामुळे कानातून रक्त आले. त्यांना उपचारांसाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुदैवाने नारळ कानाला घासून खांद्यावर आदळला!

कल्याण पश्चिमेतील मोठा म्हसोबा मैदान परिसरात तबस्सुम सलमानी या राहतात. दुपारच्या सुमारास त्या होलिक्रॉस शाळेजवळील रस्त्यावरून पायी जात होत्या. याठिकाणी नारळाची २ भलीमोठी झाडं असून त्यापैकी एका झाडाचा नारळ तबस्सुम यांच्या अंगावर पडला. हा नारळ इतक्या जोरात पडला की तबस्सुम या जागीच खाली कोसळल्या. त्याठिकाणी असणाऱ्या स्थानिकांनी तबस्सुम यांना उचलून बाजूला केले. तोपर्यंत तबस्सुम यांचे पती इरफान त्याठिकाणी दाखल झाले. तबस्सुम यांच्या कानातून रक्त येत असल्याने त्यांना डॉ. विवेक भोसले यांच्याकडे नेण्यात आले. मात्र तिथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी त्यांना मिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्या खांद्यावर प्लॅस्टर घालण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे पती इरफान यांनी सांगितले.

- Advertisement -

नारळाच्या झाडांची पालिकेकडे तक्रार

दरम्यान, नारळाच्या या झाडांबाबत गेल्या वर्षभरापासून कल्याण डोंबिवली महापालिकेकडे स्थानिकांनी तक्रारी केल्या आहेत. परंतु, अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी एक मोठी शाळा असून दररोज शाळेतील शेकडो विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेने तातडीने ही दोन्ही झाडं तोडून टाकण्याची मागणी तक्रारकर्ते डॉ. मनोज अय्यनेथ यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -