घरदेश-विदेशचांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजावेच लागतील

चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजावेच लागतील

Subscribe

टोलवर गडकरी यांचा टोला

एकीकडे महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार टोलमुक्तीचा नारा देत सत्तेवर आलेले असताना महाराष्ट्राचे खासदार आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी लोकसभेत याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजावेच लागतील, असे सांगितले आहे.

देशातील विविध भागांत टोल वसुलीवरून काही खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाला गडकरी यांनी आज लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी ज्या भागातील जनतेची टोल देण्याची क्षमता आहे त्या भागातच टोल वसुली केली जाते. या पैशांतून ग्रामीण आणि डोंगराळ भागात रस्ते बांधले जात असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

सरकारकडे विकासकामांसाठी हवा असलेला पैसा नाही. पाच वर्षांत देशात 40 हजार किमींचे राज्यमार्ग तयार करण्यात आले आहेत. चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागणार. टोल उभ्या आयुष्यात बंद होऊ शकणार नाही, मात्र, गरजेनुसार थोडा कमी-जास्त होऊ शकतो, असे गडकरी म्हणाले.

दरम्यान, गडकरी यांनी सोमवारी वाहन कायद्यात बदल केले आहेत. या विधेयकामध्ये लहान मुलांसाठी आणखी दोन नियम करण्यात आले आहेत. कारमध्ये बुस्टर सीट लावावी लागणार आहे. मागील सीटवर बसल्यास हा नियम लागू होणार आहे. मागील सीटवर बुस्टर किंवा चाईल्ड सीट लावता येते ज्यामध्ये लहान मुलाला बसवून त्याला सीटबेल्ट लावता येणार आहे. यामुळे अचानक ब्रेकिंग किंवा अपघात झाल्यास मुलाला मार बसण्याची शक्यता कमी होईल. तसेच चार वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी बाईकवरून जाताना हेल्मेट घालावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -