घरमहाराष्ट्रनाशिकओझरवरून झेपावले आंतरराष्ट्रीय विमान

ओझरवरून झेपावले आंतरराष्ट्रीय विमान

Subscribe

आयर्लंड येथील शास्त्रज्ञांच्या पथकाला घेऊन आलेल्या विमानाचे रात्री टेक ऑफ

नाशिक पथकाला घेऊन आलेले प्रवाशी विमान गुरुवारी (दि. १९ जुलै) रात्रीच्या सुमारास आयर्लंडकडे रवाना झाले. यानिमित्ताने ओझर विमानतळावरून ’नाईट लँडिंग’ व ’टेक ऑफ’ला परवानगी मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांच्या उड्डाणाचाही मार्ग मोकळा झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

शहरातील मायलॉन कंपनीच्या कामासाठी चार शास्त्रज्ञांच्या पथकाला आंतरराष्ट्रीय विमानाने नाशिकला यायचे होते. मात्र, ओझर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणाला परवानगी नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे मायलॉन कंपनी प्रशासन आणि आंतराष्ट्रीय विमानचालन सेवा कंपनीने खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधत परवानगीसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. खासदार गोडसे यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेत या विषयाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. तसेच, विमानचालन सेवा कंपनीचे अजिंक्य गोडसे, राहुल बोराडे, पंकज कासलीवाल व साजिद खान यांनी कस्टम प्रशासनाला शास्त्रज्ञांची भेट किती महत्त्वाची आहे, हे पटवून दिले. या प्रयत्नांना यश आल्याने आंतरराष्ट्रीय विमानाचे लँडिंग व टेक-ऑफ शक्य झाले. हे विमान अमेरिका-बेंगळुरू-विशाखा पट्टणम मार्गे ओझरला आले होते. त्यानंतर शास्त्रज्ञांना घेऊन ओझर विमानतळावरून गुरुवारी रात्री साडेनऊला हे विमान आयर्लंडला रवाना झाले. ओझर ते आयर्लंड हा प्रवास ९ तास २६ मिनिटांचा होता. या विमानाच्या निमित्ताने ओझर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणाचा मार्ग कायमस्वरुपी मार्गी लागणार असल्याचा विश्वास खासदार गोडसे यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -