घरमहाराष्ट्रनाशिकनिफाडमध्ये जुगार अड्डा उध्वस्त

निफाडमध्ये जुगार अड्डा उध्वस्त

Subscribe

चार जुगारींना अटक; ग्रामीण पोलिसांची कारवाई

निफाड शिवारातील जुगारअड्डा ग्रामीण पोलीसांनी उध्वस्त केला. या कारवाईत चार जुगारांना अटक करत पोलिसांनी त्यांच्याकडून १३ हजार ४५० रूपयांची रोकड जप्त केली. संशयित कल्याण नावाचा मटका जुगार खेळत होते. ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या विशेष पथकाने केली.

नाना वाळू माळी (२६ रा.कोठुरे ता.निफाड),ज्ञानेश्वर सुनिल गायकवाड (३० रा.रौळस पिंप्री ता.निफाड), सुनिल छबू चंदनशिव (४० रा.जळगाव फाटा ता.निफाड) व कुंदन त्र्यंबक कापसे (२८ रा.कापसे गल्ली,निफाड) अशी अटक केलेल्या जुगारींची नावे आहेत.

- Advertisement -

पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांचे विशेष पथक (ता.२०) शनिवारी सायंकाळी अवैध धंद्याची माहिती घेत असताना निफाड परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या मटका अड्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार हा छापा टाकला. चौघेजण कल्याण नावाचा मटका जुगार खेळत होते. त्यांच्या ताब्यातून १३ हजार ४५० रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक ए.आर.गोरडे,हवालदार मोरे शिपाई शिंदे,शेख व पोलीस नाईक गावीत यांच्या पथकाने केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -