घरदेश-विदेशगायीला प्राणी म्हणू नका, भाजप नेत्याची वायफळ बडबड!

गायीला प्राणी म्हणू नका, भाजप नेत्याची वायफळ बडबड!

Subscribe

गाय एक उपयुक्त प्राणी आहे, अशा वक्तव्यावर एका भाजप आमदारानं तीव्र आक्षेप घेतला असून त्यामुळे लोकांच्या भावना दुखावत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे!

एकीकडे देशात तथाकथित गोरक्षक आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये वारंवार वादाच्या घटना समोर येत असताना आता भाजपच्या नेत्यांकडून देखील त्यावर अजब वक्तव्य करून या वादात तेल ओतण्याचं काम केलं जात असल्याचं समोर येत आहे. नुकतंच एका राजस्थानच्या जयपूरमध्ये भाजपच्या एका नेत्याने केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ‘गायीला प्राणी म्हणायचं नाही, त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात’, असा अजब दावा या महाशयांनी केला आहे. त्यामुळे सगळेच चक्रावले आहेत! वासूदेव देवनानी असं या नेत्याचं नाव असून ते राजस्थानमधली भाजप आमदार आहेत. आता देवनानी यांनी घेतलेला आक्षेप नव्या वादाला तोंड फोडण्याची शक्यता आहे!


साध्वी प्रज्ञासिंह यांचं हे वक्तव्य तुम्ही वाचलंत का? – वक्तव्यांच्या वावटळीत लपवलेले चेहरे

गाय उपयुक्त प्राणी नाही का?

राजस्थानमधले मंत्री शांतीकुमार धारीवाल यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना गायीचा प्राणी म्हणून उल्लेख केला. ‘गाय हा एक उपयुक्त प्राणी आहे’, असं धारीवाल म्हणाले होते. मात्र, त्यावर देवनानी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘गाय आणि हिंदुत्वाविषयी धारीवाल यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. गाय ही फक्त एक प्राणी आहे, असं म्हणून त्यांनी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. या देशात गायीची आई म्हणून पूजा केली जाते’, असं देवनानी म्हणाले. वास्तविक धारीवाल यांनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या पुस्तकातलाच एक उल्लेख राजस्थानच्या विधानसभेत बोलताना केला होता. ‘गाय ही एक उपयुक्त प्राणी आहे. पण तिची पूजा करण्यात काही अर्थ नाही. सुपरवूमनची पूजा केली जाते, गाईची नाही’, असं धारीवाल म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -