घरमहा @२८८डहाणू विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १२८

डहाणू विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२८

Subscribe

पालघर जिल्ह्यातील डहाणू (विधानसभा क्र. १२८) विधानसभा मतदारसंघ आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू हा क्रमांक १२८ चा विधानसभा मतदारसंघ आहे. या जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय बलाबलावर नजर टाकल्यास बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात दोन तर काँग्रेस,भाजप, सीपीएम आणि अपक्ष यांच्या ताब्यात प्रत्येकी एक-एक मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण ३२७ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १२८

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जमाती

मतदारांची संख्या

पुरुष – १,१८,९१२

- Advertisement -

महिला – १,१५,२५९

एकूण मतदार – २,३४,१७५

dahanu MLA Dhanare Pasakal
पास्कल धनारे, भाजप

विद्यमान आमदार – पास्कल जान्या धनारे, भाजप

पास्कल जान्या धनारे हे भाजपचे विद्यमान आमदार असून तलासरी शहर ही त्यांची राजकीय कर्मभूमी आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत बविआने एकूण तीन उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. त्यातील राजेश पाटील, वसंत भसरा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बविआने माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी देऊन अनुभवी उमेदवार दिला. भाजपने डमी उमेदवार आमदार पास्कल धनारे याना एबी फॉर्म न दिल्याने त्याचा अर्ज या आधीच बाद झाला होता. त्यामुळे भाजपने माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांची उमेदवारी नक्की केली. भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून यावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गेले दहा दिवस शिवसेनेची मनधरणी करून प्रयत्न केला, मात्र शिवसेना बधली नाही. इतकेच नव्हे तर शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांना आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला विधान परिषदेत निवडून आण्याचे गाजर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या १५ मिनिटेआधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही.

पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

१. पास्कल जान्या धनारे, भाजप – ४४,८४९
२. मांगात बारक्या, माकप – २८१४९
३. काशिनाथ चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेस – २७,९६३
४. रमेश पडवले, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – १४,१६६
५. सुधीर ओझरे, अपक्ष – १२,९६८


नोटा
४४९८


हेही वाचा – पालघर लोकसभा मतदारसंघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -