घरUncategorizedदिल्लीकरांना 'मोफत' इंटरनेट सेवा मिळणार

दिल्लीकरांना ‘मोफत’ इंटरनेट सेवा मिळणार

Subscribe

दिल्लीकरांसाठी मोफत इंटनेट सेवा देणार असल्याची घोषणा केजरीवाल सरकारने केली. दिल्लीत मोफत इंटनेट सेवेला ३ ते ४ महिन्यांत सुरुवात होणार आहे, असं केजरीवाल यांनी सांगितलं.

आम आदमी सरकारने दिल्लीकरांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील सरकाने मोफत इंटरनेट सेवा देणार असल्याची घोषणा केली आहे. या मोफत वायफाय सुविधेला ३ ते ४ महिन्यात सुरुवात होणार आहे, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. निवडणुकींच्या जाहीरनाम्यात ज्या घोषणा केल्या आहेत. त्या घोषणाची पूर्तता आम्ही करत असून आम्ही हे निवडणुकीच्या दृष्टीकोनातून असं काहीही करत नसल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केजरीवाल यांनी दिल्लीतील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आल्या.

- Advertisement -

कोणकोणत्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या?

दिल्लीत एकूण ११ हजार हॉटस्पॉट बसविण्यात येणार आहे. त्यांपैकी ४ हजार हॉटस्पॉट हे शहरातील बस स्टॉपवर बसविण्यात येणार असून उर्वरित ७ हजार वायफाय हे प्रत्येक विधानसभा मतसंघात १०० याप्रमाणे बसविले जाणार आहे. प्रत्येक युझरला या मोफत इंटरनेट योजनेतून दरमहा १५ जीबी डेटा वापरता येणार आहे. इंटरनेटची स्पीट ही २०० एमबीपीएस एवढी असणार आहे. ही मोफत इंटरनेट सुविधा पीपीपी तत्वाने सुरू होणार आहे. तसेच दिल्लीतील महिल्यांच्या सुरक्षिततेसाठी २ हजार सीसीटीव्ही कॅमेरे हे विधानसभा क्षेत्रात लावण्यात येणार आहे. यामुळे चोरीसारख्या घटनांना देखील आळा बसणार आहे. या सर्वाचा १०० कोटींचा खर्च दिल्लीत सरकार उचलणार आहे, असं केजरीवाल यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -