घरदेश-विदेशमाजी केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल

माजी केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल

Subscribe

माजी केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. ‘एबीपी न्यूज’ने यासंदर्भात माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अरुण जेटली कर्करोगाने त्रस्त होते. त्यांना मांडीतील पेशींचा कॅन्सर झाला होता. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ते उपचारासाठी न्यूयॉर्कला देखील जाऊन आले. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. ६६ वर्षांचे अरुण जेटली किडनीच्या आजाराने देखील त्रस्त होते. गेल्या वर्षी १४ मे रोजी त्यांची एम्स हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती.

- Advertisement -

अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर

अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यांच्यावर विविध रोगांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयुमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला जेटली यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी एम्स रुग्णालयात हजर झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -