घरमहाराष्ट्रशरद पवारांनी पुरग्रस्तांसाठी बारामतीमध्ये अर्ध्या तासात गोळा केले एक कोटी

शरद पवारांनी पुरग्रस्तांसाठी बारामतीमध्ये अर्ध्या तासात गोळा केले एक कोटी

Subscribe

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने अक्षरशः थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी बारामतीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बैठक घेतली. अर्ध्या तासातच त्यांनी तब्बल एक कोटी रुपयांची रोख मदत उभी केली. विशेष म्हणजे या रोख रकमेशिवाय अन्नधान्य, कपडे, औषधांसह गरजेच्या वस्तूही पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पवारांच्या आवाहनाला बारामतीमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने जनजीवन विस्कळीत झाल आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विविध भागातून मदतीचा ओघ सुरु झालाय. शरद पवार यांनी विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पूरग्रस्तांसाठी मदतीबाबत आवाहन केले.

शरद पवार यांच्या मदतीनंतर त्यांचा लातूर भूकंपावेळेसचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये देखील त्यांनी एका तासात कसे कोट्यवधीची मदत गोळा केली याचे वर्णन आहे.

- Advertisement -

*१९९३ चा हा व्हिडीओ आहे, किल्लारी, लातूर येथे भुकंप झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी तेथील नागरिकांना दिलेला आधार…*नक्की पहा…..आणि आत्ता केरळ च्या घटनेनंतर मोदी सरकारचे काम पहा

Dhananjay Munde ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 7, 2018

 

- Advertisement -

शरद पवार हे अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेच्यावतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी २५ लाख असे एकूण ५० लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. या बैठकीत विविध संस्था, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने रोख स्वरुपात मदत देण्याचे जाहीर केले. तर अनेक संस्था आणि व्यक्तींच्यावतीने वेगवेगळ्या वस्तू स्वरूपातील मदत पूरग्रस्तांना पाठवली जाणार आहे.

येत्या दोन दिवसात बारामतीतून आणखी मदत जमा करुन ती पूरग्रस्तांना पाठवली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या वतीने गुरुवारी कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार एक महिन्याचं वेतन या नैसर्गिक आपत्तीसाठी देतील आणि हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. या परिस्थितीमध्ये सर्वांनी मदतीसाठी पुढे यावं, असे आवाहनही शरद पवारांनी केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -