घरदेश-विदेशपी. चिदंबरम यांना देश सोडण्यास मनाई; याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

पी. चिदंबरम यांना देश सोडण्यास मनाई; याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

Subscribe

देशाबाहेर जाण्यासाठी त्यांना ईडीची परवानगी घ्यावी लागणार आहे

आएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाही. दिल्ली हायकोर्टाने पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर सीबीआयची पथके त्यांच्या घरावर घिरट्या घालत आहेत. त्यातच आज, बुधवारी सुप्रीम कोर्टानेही तूर्तास पी. चिदंबरम यांना दिलासा दिलेला नाही. सुप्रीम कोर्टाने दिल्ली हाय कोर्टाच्या अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच आज दुपारी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी होईल, असे स्पष्ट केले. दरम्यान ईडीने पी. चिदंबरम यांना नवी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यानुसार पी. चिदंबरम यांना भारताबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे देशाबाहेर जाण्यासाठी त्यांना ईडीची परवानगी घ्यावी लागणार आहे.

यांना पाठवल्या लुकआऊट नोटीस

पी. चिदंबरम यांच्याविरोधात ईडीने काढलेली नवी लुकआऊट नोटीस महत्त्वाच्या विभागांना पाठवण्यात आली आहे. यामध्ये रस्ते परिवहन, हवाई दल आणि नौदल आदींचा समावेश आहे. काल सायंकाळपासून पी. चिदंबरम गायब आहेत. त्यामुळे ईडी त्यांचा शोध घेत आहे. या घोटाळ्यातून मिळालेल्या लाचेच्या रकमेतून पी. चिदंबरम यांचा पुत्र कार्ती चिदंबरम यांनी स्पेनमध्ये एक टेनिस क्लब आणि अमेरिकेत एक टुमदार बंगल्याची खरेदी केली. पी. चिदंबरम चौकशीला हजर राहत नाहीत, त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन ईडीला त्यांची चौकशी करायची आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल आणि प्रियंका गांधींकडून पी. चिदंबरम यांची पाठराखण

पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने पी. चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण सुप्रीम कोर्टातही पी. चिदंबरम यांची निराशा झाली. आज सुप्रीम कोर्टात न्या. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी पार पडली. मात्र या प्रकणवार कोणतेही आदेश न देता त्यांनी हे प्रकरण सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीश गोगोई यांनी शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी होईल असे स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टातही दिलासा न मिळाल्याने पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -