घरदेश-विदेशप्लास्टिकमुक्त भारत!

प्लास्टिकमुक्त भारत!

Subscribe

‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा केली, ५ वर्षे देशभर स्वच्छतेबाबत जनजागृती केली. आता दुसर्‍या कार्यकाळात मोदींनी ‘प्लास्टिकमुक्त भारता’ची घोषणा केली आहे. रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी देशवासियांना प्लास्टिकमुक्तीचे आवाहन केले. येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आहे. यानिमित्ताने देशभरात प्लास्टिकमुक्त अभियान राबण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

जन्माष्टमीच्या पाश्वर्र्भूमीवर भगवान श्री कृष्ण आणि १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्मरण करून मोदींनी कार्यक्रमाला सुरूवात केली. यावेळी म. गांधी यांचे ‘स्वच्छ भारता’चे स्वप्न पूर्ण करायचे आहे, असे मोदी म्हणाले. तसेच २ ऑक्टोबर रोजी १५० व्या जयंतीनिमित्त म. गांधी यांना हगणदारीमुक्त भारत समर्पित करु आणि प्लास्टिकच्या विरोधात एका जनआंदोलनाची सुरूवात करु, असे मोदी यांनी घोषित केले. ‘प्लास्टिक पिशवी मिळणार नाही, आपल्यासोबत कापडी पिशवी आणावी’, असे अनेक व्यापारी आणि दुकानदार यांनी त्यांच्या दुकानांबाहेर लिहिले आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी होऊन पैसेही वाचतील आणि पर्यावरणाचे रक्षणही होईल. प्रत्येक नागरिकाने यात स्वत:चे योगदान द्यावे, आपण सर्वांनी एकदाच वापरता येणार्‍या प्लॅस्टिकचा वापर टाळावा, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.

- Advertisement -

जन्माष्टमीचा उल्लेख करताना मोदींनी भगवान श्री कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचे उदाहरण दिले. त्यानंतर सध्या देशात अजून एका उत्सवाची तयारी सुरू असून तो उत्सव म्हणजे महात्मा गांधींची १५० वी जयंती असे मोदींनी नमूद केले. एकीकडे सुदर्शन चक्रधारी मोहन आहे, तर दुसरीकडे चरखाधारी मोहन (महात्मा गांधी) आहेत. सत्यासोबत गांधींचे जितके अतूट नाते राहिले आहे, तितकेच अतूट नाते लोकांची सेवा करण्यामध्येही राहिले आहे, असेही मोदी म्हणाले. महात्मा गांधी हे शेतकरी, कामगार यांच्यासाठी लढले, सर्वसामान्यांच्या सेवेत आपले आयुष्य वाहून घेतले. त्यांच्याशी निगडित असलेल्या अनेक महत्त्वांच्या वास्तूंवर जाऊन त्यांना वंदन करण्याची संधी मिळाली.

गेल्या काही वर्षांपासून आम्ही २ ऑक्टोबरच्या आधी जवळपास दोन आठवड्यापर्यंत देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान सुरू करतो. यंदा हे अभियान ११ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. २ ऑक्टोबर रोजी १५० व्या जयंतीनिमित्त म. गांधी यांना हगणदारीमुक्त भारत समर्पित करु आणि प्लास्टिकच्या विरोधात एका जनआंदोलनाची सुरूवात करु, असे मोदी म्हणाले. जागरुकता नसल्याने कुपोषणाचा परिणाम गरीब आणि संपन्न दोन्ही प्रकारच्या कुटुंबांवर पडतो, त्यामुळे याबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी सप्टेंबर हा महिना ‘पोषण अभियान’ महिना म्हणून ओळखला जाईल, असेही पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले.

- Advertisement -

एकीकडे देश पावसाचा आनंद लुटत आहे, तर दुसरीकडे देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपर्‍यात सणासुदीची लगबग सुरू आहे. दिवाळीपर्यंत देशातील वातावरण असेच राहील. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ सुरू करण्यात येईल. तसेच, ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमामुळे भारतीय संस्कृती, परंपरा, निसर्गाप्रती असलेली संवेदनशीलता आदी गोष्टींची जगाला ओळख होईल, असेही मोदी म्हणाले.

काही लोक मला म्हणाले की, डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमात बेअर ग्रिल्ससोबत तुम्ही हिंदीत संवाद साधत होता. बेअर ग्रिल्स याला हिंदी येत नाही. तरीही तो इतक्या जलद तुम्हाला उत्तर कसे काय देत होता? याचे गुपित पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये उघड केले. ही सर्व तंत्रज्ञानाची कमाल आहे. मी हिंदीत बोलल्यानंतर बेअर ग्रिल्स कानातील कॉर्डलेस इन्स्ट्रूमेंटमुळे माझे वाक्य भाषांतर करुन बेअर ग्रिल्सला कळायचे. त्यामुळे मी जरी हिंदीत बोलत असलो तरी बेअरला ते इंग्रजीत ऐकू जायचे. या डिव्हाईसमुळे आमच्या दोघांना संवाद साधणे अतिशय सोपे झाले होते, असे मोदी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -