घरमहाराष्ट्रनाशिकपाण्याच्या टाकीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू

पाण्याच्या टाकीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू

Subscribe

श्रमिकनगरमधील घटना

घरातील पाण्याच्या टाकीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अजिंक्य नरेश साळवे (८, रा.श्रमिकनगर, सातपूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. शनिवारी (ता.३१) दुपारी २ वाजेच्या दरम्यान घरातील पाण्याच्या टाकीत पडला.

आजूबाजूला कोणीही नसल्याने व त्याला पाण्यातून बाहेर न येता आल्याने अजिंक्यचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. उपचारासाठी कुटुंबियांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -