घरमुंबईसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उभारणार 'रेन वॉटर हार्वेस्टींग'

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उभारणार ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’

Subscribe

मालाड दिंडोशीमधील अनेक वस्त्यांमध्ये डोंगरावरून येणार्‍या पाण्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घटतात. यामुळे आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अडवून रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डोंगरावरून येणार्‍या पाण्यामुळे मालाड दिंडोशीमधील अनेक वस्त्यांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता हे पाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अडवून रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात छोटे नाले नसल्याने, पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे हेच पाणी डोंगर भागातील पाणी वस्तींमध्ये शिरुन भीतीचे वातावरण तयार होते. याकरता वन विभागाला हा प्रकल्प राबवण्यासाठी २ कोटी रुपये महापालिका देणार आहे.

दिडोंशीच्या डोंगरावरील पाणी अडवणार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठेही छोटे अथवा मोठे नाले उपलब्ध नाहीत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या उद्यानात डोंगराळ भागातून येणारे पाणी वस्तींमध्ये शिरते. पाण्याबरोबर वाहून येणारी माती, दगड आणि कचरा यामुळे तेथील रहिवाशांचे मोठे नुकसान होते. त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प राबवण्याची कार्यवाही करण्याची सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली होती. मालाड दिंडोशी भागातील क्रांतीनगर परिसरातील वस्तीमध्ये वन विभागाच्या डोंगराळ भागातून मोठ्याप्रमाणावर येणार्‍या या पाण्याच्या होणार्‍या त्रासातून मार्ग काढण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प राबवण्यासाठी वन विभागाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू आणि नगरसेविका विनया सावंत यांनी केली होती. त्यानुसार महापौरांनी वन विभागाला याबाबत पत्र लिहिले होते.

- Advertisement -

महापालिका देणार वन विभागाला २ कोटी रुपये

मालाड येथील वन जागेवर तसेच खासगी जागेवरील वस्तीत पावसामुळे होणार्‍या पुरपरिस्थितीमुळे वन क्षेत्रातून येणार्‍या गाळावर नियंत्रण ठेवण आवश्यक आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवलीच्या व्यवस्थापन आराखड्यात पर्यावरण पुनर्स्थापना कार्यक्षेत्रात मोडत आहे. या कामांमुळे वन्य प्राण्यांचा परिसर विकासासह पुनर्स्थापनेस मदत होणार असल्याने जल आणि मृदा संधारणाच्या कामाचा प्रस्ताव राष्ट्रीय उद्यानामार्फत सादर करण्यात आला आहे. यासाठी २ कोटी ६४ हजार रुपये खर्च होणार असून हा निधी महापालिकेने वन विभागाला देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या लेखापाल (वित्त) विभागाने स्थायी समितीला मान्यतेसाठी सादर केला आहे.


हेही वाचा – महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -