घरलाईफस्टाईलसुंदर केसांसाठी 'हे' करा

सुंदर केसांसाठी ‘हे’ करा

Subscribe

सुंदर केस होण्यासाठी अनेक महिला महागाईच्या प्रॉडक्सचा वापर करतात. मात्र याचा वापर करुन देखील केस सुंदर आणि चमकदार होत नाहीत. याउलट जास्त खराब होतात. मात्र घरच्या घरी आपण असे हेअर पॅक वापरणार आहोत. ज्यांनी केस मऊ आणि सडकदार होण्यास मदत होईल.

केस गळणे, रुक्ष होणे, कोंडा होणे अशा केसांच्या समस्या सतत उद्भवत असतात. मात्र या समस्यांवर तुम्ही आता घरच्या घरी अंड्याचा हेअर पॅक तयार करु शकाल. चला तर जाणून घेऊया अंड्याचे घरगुती हेअर पॅक…

  • केस लांबसडक होण्यासाठी अंड्याच्या पांढऱ्या बलकमध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळावे. हे तयार झालेले मिश्रण केसांच्या मुळाशी लावून मसाज करावा आणि अर्ध्या तासाने केस शॅम्पूने धुऊन घ्यावे. यामुळे केस वाढण्यास मदत होते.egg applying to hair
  • केस मऊ होण्यासाठी अंड्याच्या पांढऱ्या बलकमध्ये दही मिक्स करावे. हे मिश्रण एकत्र करुन केसांना लावून २० मिनिटे ठेवावे. त्यानंतर केस कोमट पाण्याने धुऊन घ्यावे. आठवड्यातून एक दिवस केसांना हा हेअर पॅक जरुर लावावा.
  • केस चमकदार दिसण्यासाठी केसांना अंड्याचे कंडिशनर लावाले. हे कंडिशनर तयार करण्यासाठी अंड्याच्या पांढऱ्या बलकमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिक्स करावे. हे मिश्रण चांगले एकजीव करुन केस धुतल्यावर लावून ठेवावे. १५ ते २० मिनिटांनी केस पुन्हा कोमट पाण्याने धुऊन घ्यावे. यामुळे केस चमकदार आणि मऊ होण्यास मदत होते.
    hair egg mask
  • केसाचा पोत सुधारण्यासाठी अंड्याच्या पांढऱ्या बलकमध्ये एक चमचा मध, दही आणि खोबरेल तेल एकत्र मिक्स करावे. हे तयार झालेले मिश्रण केसांना लावून मसाज करुन दोन तासाने केस धुवावे. यामुळे केसाचा पोत सुधारण्यास मदत होते.
  • विरळ केसांसाठी अंड्याचा पांढरा बलक आणि कांद्याचा रस एकत्र करुन तयार झालेला पॅक केसांना लावाला. आठवड्यातून हा प्रयोग एकदा केल्यास केस जाड होण्यास मदत होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -