घरमुंबईअपघात टाळण्यासाठी उघडया चेंबरवर लावले आदित्य ठाकरेंचे पोस्टर 

अपघात टाळण्यासाठी उघडया चेंबरवर लावले आदित्य ठाकरेंचे पोस्टर 

Subscribe

कल्याण पूर्वेतील रस्त्यांवर असलेले चेंबरचे झाकण तुटलेले असल्याने या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून उघडया चेंबरच्या बाजूला चक्क शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा पोस्टर लावण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंची जनआशिर्वाद यात्रेनिमित्त आज डोंबिवलीत आहे. कल्याण डोंबिवली शहरातील खड्डयांची समस्या खूपच गाजत आहे. खड्डयामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. सेलिब्रेटीजनेही कल्याण डोंबिवलीतील खड्डयांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

तुटलेल्या चेंबरवर आदित्य ठाकरेंचे बॅनर

आदित्य ठाकरेंच्या जनआशिर्वाद यात्रेचं अनोखं स्वागत. तुटलेल्या चेंबरमध्ये लावले आदित्य ठाकरेंचे बॅनर. कल्याण पुर्वेतील व्हिडिओ व्हायरल

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 18, 2019

- Advertisement -

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, असे असतानाही चेंबरचे तुटलेले झाकणही पालिका प्रशासन आणि सत्ताधारी बदलू शकत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे ठाकरेंचा हा पोस्टरचा व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -