घरमहाराष्ट्रनितेश राणेंच्या अडचणी वाढणार? पारकर यांचा सावंतांना पाठिंबा

नितेश राणेंच्या अडचणी वाढणार? पारकर यांचा सावंतांना पाठिंबा

Subscribe

एकीकडे राज्यात महायुतीची घोषणा झाली असताना भाजपाच्या तिकिटावर उभ्या असलेल्या नितेश राणे यांच्या विरोधात मात्र शिवसेनेने आव्हान उभे केले आहे.

नारायण राणे आणि शिवसेना वाद काही नवा नाही. त्यातच कोकणात तर हा वाद अगदी शिगेला पोहोचलाय. नारायण राणे यांना कसे अडचणीत आणता येईल? यासाठी शिवसेना नेहमीच अग्रस्थानी असते. त्यातच आता विधानसभा निवडणुकीत राणेंचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कणकवली मतदारसंघात शिवसेनेने सतीश सावंत यांनाच थेट नितेश राणे यांच्या विरोधात रिंगणात उतरवले असून, आता शिवसेना विरुद्ध राणे अशी कणकवलीमध्ये तरी रंगत पहायला मिळत आहे. एकीकडे राज्यात महायुतीची घोषणा झाली असताना भाजपाच्या तिकिटावर उभ्या असलेल्या नितेश राणे यांच्या विरोधात मात्र शिवसेनेने आव्हान उभे केले आहे.

संदेश पारकर यांची शिवसेनेला साथ 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजपाचे बंडखोर उमेदवार संदेश पारकर यांनी माघार घेत शिवसेनेच्या सतीश सावंत यांना पाठिंबा दिला आहे. संदेश पारकर यांचे कणकवली शहरात वर्चस्व असून, खासदार विनायक राऊत यांनी संदेश पारकर यांना माघार घेण्यास भाग पडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान संदेश पारकर यांनी सतीश सावंत हेच खरे महायुतीचे उमेदवार असल्याचे सांगत नितेश राणे हे महायुतीचे उमेदवार नसल्याने सतीश सावंत यांच्या पाठिशी उभे राहणार असल्याची भूमिका पारकर यांनी घेतल्याचे सागितले.

- Advertisement -

सावंतवाडीत केसरकर विरुद्ध तेली सामना

एकीकडे कणकवलीमध्ये नितेश राणे यांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने खेळी आखलेली असताना दुसरीकडे गृहराज्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपाच्या राजन तेली यांनी दंड थोपटले असून, राजन तेली हे देखील केसरकर यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -