घरमहाराष्ट्र‘चंपा’ला पवारांशिवाय काहीच दिसत नाही

‘चंपा’ला पवारांशिवाय काहीच दिसत नाही

Subscribe

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांची उडवली खिल्ली

सध्या भाजपमध्ये आघाडीची धुरा सांभाळणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना वारंवार लक्ष्य करण्याचा सपाटा लावला आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांनी ‘भविष्यात पवार कुटुंबातील तरुण भाजपमध्ये येऊ शकतात. आले तर त्यांचे स्वागत आहे’, असे वक्तव्य केले, या विषयी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना विचारले असता, त्या ‘चंपा’ला पवारांशिवाय काही दिसत नाही’ अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. यावेळी माजी आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे, विरोधी पक्ष नेते नाना काटे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, पवारांच्याशिवाय त्या ‘चंपा’ला काही दिसतच नाही. हा शॉर्ट फॉर्म आहे जस अप म्हणजे अजित पवार, तस चंपा अस त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या उत्तरावर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हास्याची लाट उसळली. पुढे ते म्हणाले की, ते (चंद्रकांत पाटील) जे काही म्हणतात त्याला काही अर्थ नाही. प्रत्येक वेळेस राजकारणातून शरद पवार दूर जातील, असे म्हणतात. शरद पवार यांनी किती चढउतार पाहिले आहे. 55 आमदारांपैकी 50 आमदार निघून गेले. पाच आमदार राहिले तरीही तितक्याच तत्परतेने बाहेर पडले. आजही तुम्ही पाहता, शरद पवार हे आक्रमक भूमिकेतून हे सरकार बदलायचे असे सांगतात, असे उत्तर पवार यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -