घरमुंबईमनसेची‌ कल्याणमध्ये चाणक्यनीती? मतदारांमध्ये चर्चा

मनसेची‌ कल्याणमध्ये चाणक्यनीती? मतदारांमध्ये चर्चा

Subscribe

कल्याण पूर्व मतदारसंघासाठी मनसेकडून अधिकृतपणे कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. सध्या याच मतदारसंघात मनसेशी संबंधित चर्चा सूरू आहे.

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यभरात आता प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे. प्रत्येक पक्षाचे नेते प्रचारामध्ये व्यग्र आहेत. कल्याणमध्येही असेच काहीसे वातावरण बघायला मिळत आहे. मात्र, नेहमीप्रमाणे कल्याणमध्ये एका व्यक्तीची प्रचंड चर्चा सुरू आहे आणि ती व्यक्ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे! मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या गेल्या आठवड्यात जाहीर केल्या. यामध्ये कल्याण ग्रामीण आणि कल्याण पश्चिम मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, कल्याण पूर्व मतदारसंघासाठी मनसेकडून अधिकृतपणे कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. सध्या याच मतदारसंघात मनसेबाबत चर्चा सूरू आहे. मनसेने या मतदारसंघात दबंग पोलीस अधिकारी म्हणून ख्याती असलेले एसीपी जगदीश लोहणकर यांना उमेदवारी दिल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, निवडणुकीसाठी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रचार होताना दिसत नाही. त्यामुळे कल्याण पूर्वच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मनसेने कल्याण पूर्वमध्ये खरच उमेदवार उभा केला आहे की नाही? असा प्रश्न मतदारांना सतावत आहे. यामागील खरे कारण आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

काय आहे नेमकी चर्चा?

काही दिवसांपूर्वी दबंग पोलीस ऑफिसर एसीपी जगदीश लोहणकर यांनी मनसेत प्रवेश केला. ते कल्याण पूर्वतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे ते कल्याण पूर्वमधून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र मनसेकडून जाहीर केलेल्या तिनही उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव दिसले नाही. लोहळकर यांच्या उमेदवारीच्या फक्त चर्चाच असल्याचे निदर्शनास येत आहे.

- Advertisement -

कल्याण पूर्वमध्ये तिहेरी लढत

कल्याण पूर्वमध्ये मनसेचे उमेदवार दिसत नसल्यामुळे भाजप उमेदवार गणपत गायकवाड, राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश तरे आणि शिवसेनेचे बंडखोर नेते धनंजय बोडारे यांच्यात तिहेरी लढत बघायला मिळत आहे. गणपत गायकवाड हे गेल्या दहा वर्षांपासून कल्याण पूर्वचे आमदार आहेत. ते महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र, शिवसेनेचे उल्हासनगरचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बोडारे यांना शिवसेनेकडून चुपा पाठिंबा मिळत असल्याचीदेखील चर्चा आहे. याशिवाय कल्याणची शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. त्यामुळे यावेळी गणपत गायकवाड यांच्यापुढे बोडारे यांचे कडवे आव्हान आहे.

कल्याण ग्रामीणमध्ये दुहेरी लढत

कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेने राजू पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महाआघाडीतून ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली गेली आहे. मात्र राष्ट्रवादीकडून मनसेला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. तर शिवसेनेकडून ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये दुहेरी लढत बघायला मिळत आहे.

- Advertisement -

कल्याण पूर्वमधील लढत

भाजप (महायुती) – गणपत गायकवाड
बंडखोर (शिवसेना) – धनंजय बोडारे
राष्ट्रवादी (महाआघाडी) – प्रकाश तरे

कल्याण पश्चिममधील लढत

शिवसेना (महायुती) – विश्वनाथ भोईर
बंडखोर (भाजप) – नरेंद्र पवार
कॉंग्रेस (महाआघाडी) – कांचन कुलकर्णी
मनसे – प्रकाश भोईर

कल्याण ग्रामीणमधील लढत

शिवसेना (महायुती) – रमेश म्हात्रे
मनसे – प्रमोद (राजू) पाटील
महाआघाडीतून ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली गेली. मात्र राष्ट्रवादीकडून मनसेला पाठिंबा जाहीर


हेही वाचा – अजित पवारांच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत – मुख्यमंत्री

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -