घरमुंबईप्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराला पनवेलमध्ये मोठा प्रतिसाद

प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराला पनवेलमध्ये मोठा प्रतिसाद

Subscribe

पनवेलच्या सर्वांगीण विकासाठी सतत प्रयत्नशील असणार्‍या आमदार प्रशांत ठाकूर यांचा आवाज मंगळवारी पनवेल नगरीत घुमला. नावडे, पेंधर, कोयनावेळ, घोट, नितळस, खैरणे, ढोंगर्‍याचा पाडा, वावंजे, पाले खुर्द, देवीचा पाडा, कानपोली या प्रचार दौर्‍यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सार्‍या गावातील जनता त्यांच्या स्वागतासाठी जमली होती.

यावेळी प्रशांत ठाकूर यांच्याबरोबर प्रचारात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, कृष्णा पाटील, गौरव भोईर, रवींद्र खानावकर, युवा मोर्चाचे महानगर प्रमुख दिनेश खानावकर, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

- Advertisement -

ठाकूर यांना मोठा प्रतिसाद मिळत असताना इतर पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कोयनावेळे येथील बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत हाती कमळ घेतले. तसेच रायगड जिल्हा कोळी महासंघानेही प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -