घरमहाराष्ट्रनाशिकबाळासाहेब सानप शिवसेनेत

बाळासाहेब सानप शिवसेनेत

Subscribe

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवा मार्ग, भाजपमधून राष्ट्रवादी आणि आता शिवसेनेत घेतली उडी

भाजपने तिकिट नाकारल्यानंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे राहिलेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी काही वेळापूर्वी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सानप यांची भेट घेतल्यापासूनच सानपांच्या तळ्यात-मळ्यात भूमिकेची चर्चा सुरू होती.

सानपांच्या शिवसेना प्रवेशाचे बिजारोपण विधान परिषदेच्या निवडणुकीवेळीच झाले होते. त्या वेळी शिवसेनेकडून नरेंद्र दराडे हे उमेदवार होते, तर राष्ट्रवादीकडून शिवाजी सहाणे उमेदवार होते. सहाणेंना पाठिंबा द्यायचा, असे ठरले असतानाही सानप दराडे यांच्या पाठिशी होते. त्याचवेळी हे बिजारोपण झाल्याचे सांगितले जाते आहे. भाजप-शिवसेना युती झाली नसती तर सानपांना नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून  शिवसेनेकडून संधी मिळाली असती, मात्र युतीमुळे त्यावर पाणी फेरले गेले. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर सानपांनी राजकीय डाव खेळत तातडीने राष्ट्रवादीत प्रवेश करत या पक्षाकडून तिकिट पटकावले. मात्र, या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आधीच ठरल्याप्रमाणे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, सानपांच्या शिवसेना प्रवेशामुळे महापालिकेतील सत्ता समिकरणांमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -