घरमुंबईसत्ता स्थापनेसाठी भाजप आखतेय २०१४ ची रणनीती?

सत्ता स्थापनेसाठी भाजप आखतेय २०१४ ची रणनीती?

Subscribe

भाजपच्या निवडून आलेल्या १०५ आमदारांची ३० ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात विधीमंडळ नेता निवडीवर तसेच मुख्यमंत्री भाजप असेल यावर देखील चर्चा होणार

मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा अशी ताठर भूमिका शिवसेनेने घेतल्यानंतर आता भाजप देखील सत्ता स्थापनेसाठी २०१४ साली ज्या रणनीतीचा वापर केला होता, तशाच प्रकारची रणनीती पुन्हा आखत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करून शपथविधी सोहळा उरकून घ्यायचा आणि नंतर सभागृहात बहुमत सिद्ध करावे, असा सुर भाजपमधील एका गटाचा आहे. यावर सध्या भाजपमध्ये विचारमंथन सुरू असून, ३० तारीखेला अमित शहा यांच्या उपस्थितीत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे देखील समजते आहे.  जर यावर शिक्का मोर्तब झाला तर मुख्यमंत्र्यासह काही मंत्र्यांना ३१ ऑक्टोबरला शपथ द्यायची असा विचार देखील भाजप करत आहे. तसेच सरकार स्थापन केल्यानंतर २०१४ साली जशी शिवसेनेला गळ घालण्यात आली तशीच गळ घालून, सभागृहात बहुमत सिद्ध करायचे असा विचार भाजप करत आहे.

मुख्यमंत्री भाजपचा होणार 

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी ‘मी पुन्हा येणार’ असे सभागृहात सांगितले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री भाजपचा व्हावा यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच भाजपच्या निवडून आलेल्या १०५ आमदारांची ३० ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात विधीमंडळ नेता निवडीवर तसेच मुख्यमंत्री भाजप असेल यावर देखील चर्चा होणार आहे.

३० तारीखेला भाजपच्या नव निर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. तसेच ते दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर जातील.

– गिरीश व्यास, प्रवक्ते, भाजप

- Advertisement -

अमित शहा येणार मुंबईत 

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ३० ऑक्टोबरला भाजपच्या नवनिर्वाचित आमदाराच्या बैठकित उपस्थित राहणार आहेत. तसेच ही बैठकल संपल्यानंतर अमित शहा मातोश्रीवर देखील जाणार अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.


हरयाणाचे मनोहर लाल खट्टर दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -