घरमुंबईमध्य रेल्वे मार्गावर युटीएस अ‍ॅप सुसाट

मध्य रेल्वे मार्गावर युटीएस अ‍ॅप सुसाट

Subscribe

एका दिवसात 91 हजार 454 तिकीटे काढली

मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत युटीएस अ‍ॅपच्या माध्यमातून दररोज 91 हजार 454 तिकीटांच्या टप्पा पार केला आहे. आतापर्यंतच्या सर्वाधिक असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहेत.मुंबईतील तिकीट खिडक्यांवरील वाढत्या गर्दीपासून प्रवाशांची सुटका व्हावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने युटीएस अ‍ॅपची निर्मिती केली होती. त्याला मध्य रेल्वेच्या प्रवशांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहेत.त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर युटीएस अ‍ॅप सुसाट धावत आहे.

एप्रिल 2017 ला या युटीएस मोबाईल अ‍ॅपची युजर्स संख्या एकूण 3 लाख 74 हजार होती. पाहिजे तितका प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र मध्य रेल्वेने या यूटीएस मोबाइल अ‍ॅपची लोकप्रिय वाढविण्यासाठीमिशन मोडव याअ‍ॅपची जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेमुळे मध्य रेल्वेच्या प्रवशांनी युटीएस अ‍ॅपला प्रचंड प्रतिसाद दिला. जून 2019 मध्ये युटीएस अ‍ॅप युजर्सची एकूण संख्या 6 लाख 23 हजार 308 इतकी होती. मात्र ऑगस्टपर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील युटीएस अ‍ॅप युजर्सची एकूण संख्या 8 लाख 15हजार 229 इतकी झाली आहे.मुंबईमध्ये 21 स्पटेंबर 2019ला 81,125 तिकिटे घेतली गेली.

- Advertisement -

तर आता मुंबई विभागात युटीएसच्या माध्यमातून 87 हजार 403 तिकीट काढण्यात आली आहेत. जी आतपर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक आहेत.विशेष म्हणजे मध्य रेल्वेचा पाचही विभागात 4 नोव्हेंबरला 2019 रोजी युटीएस अँपच्या माध्यमातून 91 हजार 454 तिकीट काढण्यात आली असून या माध्यमातून तब्बल 8 लाख 38 हजार 931 प्रवाशांनी प्रवास केला आहेत. तर 70 लाख 35 हजार 589 रूपयांचा मध्य रेल्वेने महसूल गोळा केला आहे. लवकरच मुंबईत यूटीएस अ‍ॅप दररोज 1 लाख तिकिटांचा टप्पा पार करेल, अशी आशा आहे, ज्यामुळे प्रवाशांचा रांगेतील प्रतिक्षा वेळ कमी झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -