घरक्रीडाभारतीय तिरंदाजांना दक्षिण आशियाई स्पर्धेत सहभाग नाही!

भारतीय तिरंदाजांना दक्षिण आशियाई स्पर्धेत सहभाग नाही!

Subscribe

पुढील वर्षी होणार्‍या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करणार्‍या भारतीय तिरंदाजांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. जागतिक तिरंदाजी संघटनेने काही महिन्यांपूर्वी भारतीय तिरंदाजी संघावर बंदी घातली होती. त्यामुळे भारताच्या तिरंदाजांना आगामी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. तसेच भारतीय तिरंदाजांना १ ते १० डिसेंबर या कालावधीत नेपाळमध्ये होणार्‍या दक्षिण आशियाई स्पर्धेतही भाग घेता येणार नाही. याबाबतचा निर्णय नुकत्याच ढाका येथे झालेल्या दक्षिण आशियाई तिरंदाजी फेडरेशनच्या बैठकीत घेण्यात आला.

भारताच्या खासकरून महिला तिरंदाजांसाठी ही चिंतेची बाब आहे, कारण काही महिला तिरंदाज अजून टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र झालेल्या नाहीत. तसेच भारतीय तिरंदाजी संघावरील बंदीमुळे गुरुवारपासून सुरु होणार्‍या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे तिरंदाज ’जगातील तिरंदाजी ध्वजाखाली’ खेळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीयांनी तिरंदाजांनी जिंकलेली पदके ही देशाच्या खात्यात जाणार नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -