घरटेक-वेकनवीन वर्षात फाइव्ह स्टार फ्रिज, एसी महागणार

नवीन वर्षात फाइव्ह स्टार फ्रिज, एसी महागणार

Subscribe

येणाऱ्या नवीन वर्षात एसी आणि फ्रिजच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे याचा फटका फाइव्ह स्टार फ्रिज, एसी खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे.

नव्या वर्षात अनेक मंडळी काहींना काही खरेदी करण्यासाठी उत्साही असतात. मात्र, जर तुम्ही येत्या नवीन वर्षात जर फाइव्ह स्टारचा फ्रिज किंवा एसी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तो महाग पडणार आहे. येणाऱ्या काळात फाइव्ह स्टारचा दर्जा असलेल्या किमती तब्बल पाच – सहा हजार रुपयांनी वाढणार आहेत. फाइव्ह स्टार एसी, फ्रिज या वस्तू बनवताना कुलिंगसाठी यापूर्वी फोमचा वापर केला जायचा. मात्र, आता फोमऐवजी व्हॅक्युम पॅनल बसवले जाणार आहेत. तसेच त्याचा खर्च हा फोमपेक्षा अधिक असल्यामुळे फ्रिजच्या किमतीत वाढ होणार असल्याचे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड अल्पलाईन्सेस मॅनिफॅक्सर्च असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

१५ टक्के वाढ

एसी आणि फ्रिडसारख्या मशीनमध्ये कॉम्प्रेसरचा वापर केला जातो. त्याच्या एनर्जी लेबलिंग गाइडलाइनमध्ये बदल करण्याचा निर्णय ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीने घेतला आहे. त्याचा परिणाम फ्रिजच्या किमतीवर होणार आहे. त्यामुळे उद्योगांसाठी हे एक आव्हान असणार आहे. याशिवाय फ्रोस्ट फ्री आणि डारेक्ट कूलिंगमध्ये एक स्टारचा देखील बदल असेल. त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानासाठी कंपन्यांना आपल्या फॅक्टरीमध्ये अधिक गुंतवणूक करावी लागते. मात्र, कोणत्याही कंपनीला गुंतवणूक करायची नाही, असे केल्यास कंपंन्यांना फाइव्ह स्टार रेटिंग मिळणार नाही.

- Advertisement -

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतच एसीच्या विक्रीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे आधीपासून सुरु असलेल्या ३५ टक्के वाढीपेक्षा अधिक आहे. त्याचबरोबर असोसिएशनने सरकारकडे मागणी केली आहे, की एसीवरील जीएसटी कमी करुन १८ टक्के स्लॅबमध्ये आणावी.

या वाढत्या किमतीचा संपूर्ण इंडस्ट्रीला फटका बसणार आहे. कमल नंदी; असोसिएशनचे अध्यक्ष

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रातील सत्ताकोंडी कायम;आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -