घरमहाराष्ट्र'आम्ही ३० मिनिटात बहुमत सिद्ध करु'

‘आम्ही ३० मिनिटात बहुमत सिद्ध करु’

Subscribe

आम्ही ३० तास काय ३० मिनिटात बहुमत सिद्ध करु शकत',असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर सुरू असलेल्या सुनावणीमध्ये अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. या निर्णयानुसार २७ नोव्हेंबर रोजीच बहुमत चाचणी घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवाय, बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी व्हायला हवेत, असे देखील न्यायालयाने बजावले आहे. या निर्णयाचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले असून ‘आम्ही ३० तास काय ३० मिनिटात बहुमत सिद्ध करु शकतो’,असा दावा त्यांनी केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत

‘या देशात न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. न्यायालयात आम्ही जे बोलत होतो, ते सत्य होते. न्यायालयाच्या निकालाने ते खरे ठरवले आहे. सत्याचा विजय झाला आहे,’ असे देखील संजय राऊत पुढे म्हणाले आहेत. तसेच ‘आमचे सगळे मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहेत. या देशात अजूनही सत्य पराभूत होत नाही. आम्ही ३० तास काय ३० मिनिटांतही बहुमत सिद्ध करु शकतो,’ असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

काय झालं सुनावणीदरम्यान?

शनिवारी २३ नोव्हेंबरला भल्या सकाळीच राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. मात्र, यावरच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे दुसऱ्या क्रमांकाचे न्यायमूर्ती रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यामध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा देखील समावेश होता. यामध्ये महाविकास आघाडीकडून तातडीने बहुमत चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.


हेही वाचा – अखेर निकाल आला! ‘२७ नोव्हेंबरला बहुमत चाचणी घ्या’, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -