घरमहाराष्ट्र'त्या' आंबेडकरी विद्यार्थ्यांची अखेर सुटका

‘त्या’ आंबेडकरी विद्यार्थ्यांची अखेर सुटका

Subscribe

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली अटक करण्यात आलेल्या त्या आंबेडकरी विद्यार्थ्यांची अखेर जामिनावर सुटका झाली आहे. त्या युवकांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून मंगळवारी त्यांना वाशी नाका चेंबूर येथून अटक करण्यात आली होती.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली अटक करण्यात आलेल्या पाच आंबेडकरी विद्यार्थ्यांची अखेर गुरूवारी जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ‘त्या’ युवकांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून मंगळवारी वाशी नाका चेंबूर येथून अटक केलेल्या संतोष कांबळे, विष्णू गायकवाड यांची १५ हजार रूपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली केली आहे. तर प्रितेश दयानंद कांबळे, सुशांत कृष्णा कांबळे आणि स्वप्नील सुभाष शिंगे यांना प्रत्येकी ५ हजार रूपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. पोलिसांच्या बेकायदेशीर अटक सत्राविरोधात ‘आपलं महानगर’ने सरकारवर प्रश्न उपस्थित केला होता. हिंसाचार प्रकरणी सहभागी लोकांवरील गुन्हे मागे घेण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी चार महिन्यांपूर्वी दिली होती. तरीही दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या अटकसत्रामुळे आंबेडकरी वस्त्यांमधून संताप व्यक्त झाला होता.

वाचाः भीमा कोरेगाव आंदोलनकर्त्या आंबेडकरी विद्यार्थ्यांना अटक

भाजप सरकारवर प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हवेतील आश्वासनाची बातमी निर्भीडपणे आंबेडकरी समाजाचा आवाज व सरकारतर्फे पोलिसांच्या माध्यमातून होणारा अन्याय, अत्याचार हा लोकांपर्यंत पोहचविल्याबद्दल अटक झालेल्या आंबेडकरी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपलं महानगरचे आभार मानले आहेत. या दलित विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या सरकारवरील संस्कार हे सांघिक विचारसरणीचे आहेत, अशी टीका काँग्रेस प्रवक्ता रत्नाकर महाजन यांनी केली आहे. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटकही झाली आहे. मात्र संभाजी भिडे वारकऱ्यांच्या वारीत सहभागी होतात. परंतू मुख्यमंत्री यांचे पोलीस भिडे गुरुजीना संरक्षण देतात आणि सहा महिन्यानंतर भीमा कोरेगावच्या आंदोलन प्रकरणी आंबेडकरी विद्यार्थ्यांना अटक होते. यामुळे भाजप सरकारचे विचार काय आहेत हे स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

आठवले १५ ला घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपलं महानगरने ही बातमी परखडपणे मांडल्यानंतर, या प्रकरणी आपण माहिती घेत असून लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले. तसेच निर्दोष आंदोलकांवर गुन्हे दाखल करून अटक करणार नसल्याचे आश्वासन यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याने याबाबत पोलिसांनी ही निर्दोषांवर कारवाई करता कामा नये. याबाबत मुंबईत परतल्यावर १५ जुलै रोजी सविस्तर भूमिका मांडणार असून भीम सैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सदैव दक्ष आहोत, असेही आठवले म्हणाले. सनदशीर मार्गाने आंदोलनात सहभागी झालेल्या शांतताप्रिय भीम सैनिकांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष कायम असल्याचं आठवले यांनी यावेळी म्हटलं आहे.

सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांना मदत

भीमा कोरेगाव प्रकरणी ३ जानेवारी २०१८ रोजी आंबेडकरी जनतेतर्फे झालेल्या स्वयंस्फूर्त महाराष्ट्र बंदमध्ये भीमसैनिक आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वप्रथम भेट घेतली होती. त्यानंतर याबाबत मुख्यमंत्र्यांनी जाहीर घोषणा करून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले होते. मात्र ज्या ठिकाणी गंभीर गुन्हे घडले आहेत. त्या परिसराचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात असून त्यातील मोजक्या लोकांवरच कारवाई होणार होती. आता मात्र निर्दोष विद्यार्थ्यांवर कारवाई होत असल्यात ते योग्य नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -