घरदेश-विदेशउंदराच्या विषानं दात घासले आणि झाला मृत्यू!

उंदराच्या विषानं दात घासले आणि झाला मृत्यू!

Subscribe

कर्नाटकातल्या एका महिलेनं टूथपेस्ट समजून उंदराच्या विषानं आपले दात खासले, त्यानंतर काही दिवसात त्यांचा मृत्यू झाला.

कर्नाटकात राहणाऱ्या एका महिलेनं चूकून उंदराच्या विषाला टूथपेस्ट समजून वापरलं, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. तर पोलीसांनी तिचा मृत्यू अनैसर्गिकपणे झाल्याचा अहवाल दिला. या महिलेचं नाव लीला करकेरा असून ती ५७ वर्षांच्या होती. कर्नाटकात उडपी शहराच्या जवळ असलेल्या मालपे या ठिकाणात ही घटना घडलेली आहे. १९ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजता ही घटना घडली होती. त्या महिलेला टूथपेस्ट आणि उंदराच्या विषाची ट्यूब दिसायला सारखी असल्याने यातील फरक त्या महिलेला लक्षात आला नाही, असा अंदाज पोलीसांनी लावलेला आहे. ही घटना घडल्यानंतर महिलेला ताबडतोब एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं.

कशी झाली गडबड?

‘रॅटॉल’ नावाच्या उंदराच्या विषाची पेस्ट ही एका टूथपेस्ट सारख्या ट्यूबमध्ये भारताच्या बाजारात सहज उपलब्ध असते. दोघांची पॅकेजिंग ही एक सारखी असल्यामुळे टूथपेस्ट आणि या उंदराच्या विषाच्या पेस्टमध्ये गोंधळणं सहाजिक आहे. तरी या विषावर काही उपाय नसल्यामुळे ते माणसाच्या शरीरात गेल्यावर मृत्यू होण्याची शक्यता असते.

- Advertisement -
टूथपेस्ट सारखी दिसणारी उंदराच्या विषाटी ट्यूब
टूथपेस्ट सारखी दिसणारी उंदराच्या विषाची ट्यूब

ही गोष्ट काही नवल नसून आधी देखील अशा घटना घडलेल्या आहेत. २०१२ मध्ये पुडुचेरी येथे राहणाऱ्या दोन लहान मुलांचा विषानं दात घासल्यामुळे मृत्यू झाला होता. तर आणखी एका ५ वर्षीय मुलीचा, चूकून विषाचं सेवन केल्यामुळे यकृतात बिघाड होऊन मृत्यू झाला.या विषात असलेल्या एका रासायनिक पदार्थामुळे यकृत बिघडण्याची शक्यता असते. तर यावर काही उपाय नसून यकृत प्रत्यारोपण करणे हा एकच पर्याय असतो. या विषावर काही उपाय नसल्यामुळे करकेरा या महिलेचा रविवार २४ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.


हेही वाचा – सीबीएसई बोर्ड पेपर पॅटर्नमध्ये होणार बदल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -