घरदेश-विदेशसीबीएसई बोर्ड पेपर पॅटर्नमध्ये होणार बदल

सीबीएसई बोर्ड पेपर पॅटर्नमध्ये होणार बदल

Subscribe

यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना २० टक्के वैकल्पिक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील तर १० टक्के प्रश्न सर्जनशील कल्पनांवर आधारित असणार

दहावी आणि बारावीच्या सीबीएसईच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठा बदल होणार आहे. काळानुसार हा बदल केला जाणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. तर विद्यार्थ्यांमधील सर्जनशील आणि विश्लेषणक्षमता वाढावी, याकरता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ २०२३ पर्यंत बदल करणार आहे.

यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना २० टक्के वैकल्पिक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील तर १० टक्के प्रश्न सर्जनशील कल्पनांवर आधारित असणार आहे. दहावी आणि बारावीच्या रचनात्मक आणि विश्लेषणात्मक अशा प्रश्नपत्रिका २०२३ पर्यंत असणार आहे. देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून हा बदल करण्याची गरज आहे, असे सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

शिक्षण प्रणालीत अभ्यासक्रमाचा मूळ कणा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमधील संबंधांना चालना देण्याची गरज आहे. या नवीन बदलामुळे आणि शिक्षण धोरणाचे उद्दिष्ट व्यावसायिक विषयातील आणि मुख्य प्रवाहातील विषयामधील अंतर कमी व्हावे हा हेतू आहे, असे भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळाद्वारे आयोजित शैक्षणिक परिषदेत त्रिपाठी यांनी सांगितले.

दहावी-बारावीचे वेळापत्रक शिक्षण मंडळाकडून जाहीर

दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता १२ वीची लेखी परीक्षा मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२० ते बुधवार दिनांक १८ मार्च २०२० या दरम्यान घेण्यात येणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा मंगळवार दिनांक ३ मार्च २०२० ते सोमवार, दिनांक २३ मार्च २०२० या कालावधीत निश्चित करण्यात आला आहे. या घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेसाठी साधारण साडे तीन महिन्याचा तर दहावीच्या परिक्षेस चार महिन्याचा अवधी शिल्लक आहे.


दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक शिक्षण मंडळाकडून जाहीर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -