घरट्रेंडिंगपाकिस्तानात 'या' तीन भारतीयांचा घेतला जातोय शोध!

पाकिस्तानात ‘या’ तीन भारतीयांचा घेतला जातोय शोध!

Subscribe

पाकिस्तानमधील नागरिक आणि विशेषत: नेटिझन्स तीन भारतीयांचा गेल्या वर्षभरात कसून शोध घेत होते. कोण होते हे तीन भारतीय?

भारत आणि पाकिस्तानमधले संबंध जगजाहीर आहेत. या दोन्ही देशांमध्ये अनेक कारणांमुळे संबंध तणावपूर्ण झाले आहेत. काश्मीर हा त्यातल्या सर्वात महत्वाचा मुद्दा. पण असं असलं, तरी हे तणावपूर्ण संबंध फक्त राजकीय पातळीवर असून पाकिस्तानी नागरिक मात्र, यापासून लांब असल्याचं एका निरीक्षणावरून दिसून आलं आहे. पाकिस्तानमधील नागरीक ३ भारतीयांचा मोठ्या प्रमाणावर शोध घेत असल्याचं स्पष्ट झालं आहे. २०१९ या वर्षभरात या तिघांचा पाकिस्तानी नागरिकांनी कसून शोध घेतला आहे. अर्थात, त्यासाठी प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असली, तरी त्यांना याच तीन भारतीयांमध्ये का इतका रस होता, याबद्दल मात्र अद्याप पूर्ण खुलासा होऊ शकलेला नाही. २०१९ या वर्षभरात पाकिस्तानी नागरिकांनी सर्वाधिक शोध घेतलेल्या व्यक्तींपैकी पहिल्या १० व्यक्तींमध्ये या तीन भारतीयांचा समावेश आहे.

कोण आहेत ‘ते’ तीन भारतीय?

गुगलने गेल्या वर्षभरात म्हणजेच २०१९मध्ये गुगलवर वेगवेगळ्या देशांमधून सर्च केल्या जाणाऱ्या व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार पाकिस्तानमधल्या अशा सर्च केलेल्या व्यक्तींमध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावर पाकिस्तानी अभिनेत्री नईम खवर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Naimal Khawar Abbasi (@naimalkhawarkhan) on

- Advertisement -

पण या यादीमध्ये तुम्ही अजून खाली गेलात, तर पाकिस्तानी नेटिझन्स गुगलवर सर्वाधिक सर्च करत असलेल्या व्यक्तींमध्ये पाचव्या स्थानावर भारतीय गायक अदनान सामी आहे.

 

View this post on Instagram

 

A spontaneous jam from #thevoice #thevoiceindia . #livemusic #rhythm #jam #bollywood #adnansamilive #singers #india #love

A post shared by Adnan Sami (@adnansamiworld) on

तर सहाव्या स्थानावर भारतीय अभिनेत्री आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आहे.

 

View this post on Instagram

 

??☠️

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

- Advertisement -

याच यादीमध्ये नवव्या क्रमांकावर विंग कमांडर आणि पाकिस्तानने अटक केलेलला भारतीय जवान अभिनंदन वर्धमान देखील आहे.

दरम्यान, या तिघांसोबतच पाकिस्तानी नेटिझन्स बिग बॉस सीजन १३, कबीर सिंग सिनेमा, गल्ली बॉय सिनेमा यासाठी देखील गुगलवर आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -