घरमहाराष्ट्रतंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर टार-निकोटीन प्रमाणची नोंद होणार

तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर टार-निकोटीन प्रमाणची नोंद होणार

Subscribe

विडी-सिगारेट उत्पादकांना सूचना जारी करण्याची राज्य एफडीएचे एफएसएसएआयला पत्र

तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांवर टार आणि निकोटीन प्रमाणाची नोंद नसते. हा मुद्दा ऑल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर असोसिएशनकडून एफडीएला कळवल्यानंतर राज्य एफडीएकडून पाऊल उचलण्यात आले. भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकारणाने सर्व तंबाखूजन्य उत्पादकांनी टार निकोटीनच्या प्रमाणाची पाकिटावर नोंद करण्याची नोटीस जारी करण्याची विनंती राज्य अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

विडी-सिगारेटच्या पाकिटांवर त्यातील टार-निकोटीनची नोंद छापत नसल्याने प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन होत आहे. यामुळे कर्करोगाला कारणीभूत असलेल्या या दोन्ही पदार्थांच्या प्रमाणाचा उल्लेख प्रत्येक पाकिटावर करण्यात यावा अशी मागणी एएफडीएलएचए संघटनेकडून करण्यात आली होती. मागणीबाबतचा मेल एफडीएला करण्यात आल्यावर एफडीएने भारतीय अन्नसुरक्षा व मानक प्राधिकारणाने उत्पादकांना कळवण्याची विनंती करण्यात आली आहे.

- Advertisement -

धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांवर धूम्रपानामुळे उद्भवणाऱ्या कर्करोगाचा उल्लेख आणि संबंधित फोटो छापले जातात. तशी सूचना छापणे कायद्याने बंधनकारक आहे. पण, त्याचसोबत आतील तंबाखू पदार्थांमध्ये निकोटीन आणि टार या दोन्ही प्रमाणाचा उल्लेख करणे कायद्याने बंधनकारक असतानाही ते प्रमाण छापले जात नाही. २००३ च्या कायद्यानुसार तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रतिबंधात्मक संदेश पाकिटावर छापण्यास सुरुवात करण्यात आली. या कायद्यातच निकोटीन आणि टार पदार्थांचे प्रमाण लिहावे असे नियोजित होते. पण, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने एफडीएकडून एफएसएसएआय प्राधिकरणाला तंबाखूजन्य उत्पादकांना नोटीस जारी करण्याबाबतचे सुचवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -