घरलाईफस्टाईलनाताळ स्पेशल : 'केक' रेसिपी

नाताळ स्पेशल : ‘केक’ रेसिपी

Subscribe

नाताळ सणानिमित्त स्पेशल केक रेसिपी

मेरी ख्रिसमस, असे म्हणत नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या नाताळ सणानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे जिंगल बेल, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजची टोपी, आकाश दिवे, सांताक्लॉजचे टीशर्ट या सर्व वस्तूंनी बाजारपेठ सजल्या असून आता वेध लागले आहेत केक खाण्याचे. मग तुम्ही करणार ना नाताळनिमित्त घरच्या घरी केक. चला तर पाहुया स्पेशल केक रेसिपी

‘रवा’ केक रेसिपी

- Advertisement -

साहित्य 

- Advertisement -

दीड कप रवा
अर्धा कप मैदा
१ कप दूध
अर्धा कप तेल
अर्धा कप दही
१ कप साखर पावडर
१ चमचा इसेन्स
१ पाकीट इनो

कृती

सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप दूध, अर्धा कप तेल, अर्धा कप दही आणि १ कप साखर पावडर एकत्र करून ग्राईन्ड करून घेणे. नंतर मैदा, रवा चालून घ्यावा. त्यानंतर मैदा आणि रव्यामध्ये चिमूटभर मीठ घालून ते तयार बॅटरमध्ये एकजीव करून घेणे. हे मिश्रण अर्धा तास झाकून ठेवावं. यामुळे मैदा चांगला फुलण्यास मदत होते. त्यांनतर त्या बॅटरमध्ये उरलेले अर्धा कप दूध घालून घट्ट असलेले मिश्रण थोडे पातळ होण्यास मदत होते. त्यानंतर त्यात टूटीफ्रुटी, इनो आणि इसेन्स टाकून पुन्हा एकजीव करून घ्यावे.

नंतर भांड्याला तेल लावून त्यावर मैदा शिवरून केकच्या भांड्यात बॅटर ओतावे. त्यानंतर कुकरमध्ये कुकरच्या जाळीवर केकचे भांड ठेऊन कुकरची रिंग आणि शिट्टी काढून ४५ मिनिटे ठेवावे. मग करून पहा झटपट घरच्या घरी रवा केक.

‘बिस्कीट’ केक रेसिपी

 

साहित्य

१२५ ग्रॅम टायगर बिस्किट
१ कप दूध
४ चमचे साखर
२ चमचे कोको पावडर
१ चमचा खाण्याचा सोडा

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात बिस्किट टाकून त्यात एक कप दूध, कोका पावडर, साखर आणि खाण्याचा सोडा मिक्स करून ते मिश्रण चमच्याने चांगले फेटून घ्या. नंतर केक पॅनमध्ये मिश्रण टाकून ओव्हनमध्ये तीन मिनिटे बेक करा. अशाप्रकारे झटपट बिस्कीट केक तयार.

‘चॉकलेट केक’ रेसिपी

साहित्य

१ कप मैदा
५० ग्रॅम कोको पावडर
१ कप कनडेंस्ड मिल्क
अर्धा कप पिठी साखर
३ ते ४ चमचे दूध
८० ग्रॅम बटर
१० ते १२ काजू
१ छोटा चमचा बेकिंग पावडर
१/४ छोटा चमचा बेकिंग सोडा

कृत्ती

सर्वप्रथम मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून घ्या. त्यानंतर पिठी साखरमध्ये बटर एकत्र करुन ते फेटून घ्या. चांगल फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये कनडेंस्ड मिल्क घालून पुन्हा एकदा सर्व सारण एकजीव करुन त्यामध्ये दूध घालून चांगले फेटून घ्या. सर्व सारण फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये १० ते १२ काजू घालून पुन्हा एकदा सारण एकजीव करुन घेणे. त्यानंतर एका भांड्यात बटर लावून त्यावर मैदा पसरवून घ्या. त्यानंतर एकजीव केलेले सर्व सारण त्या भांड्यात घालून ते भांडे सेट करुन घ्या. कुकरमध्ये केक बनवायचा असल्यास त्या कुकरची रिंग आणि शिट्टी काढून कुकरमध्ये मीठ घालून कुकर २० ते २५ मिनिटे तापून घ्या. त्यानंतर ते केकचे भांडे स्डँवर ठेऊन ४० मिनिटे केक बनवण्यासाठी ठेऊन द्या. अशाप्रकारे तुमचा घरच्या घरी कुकरमधला केक तयार होऊन तो केक सर्व्ह करा.


हेही वाचा – हिवाळ्यातील स्पेशल रेसिपी : मेथीचे लाडू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -