घरलाईफस्टाईलहिवाळ्यातील स्पेशल रेसिपी : मेथीचे लाडू

हिवाळ्यातील स्पेशल रेसिपी : मेथीचे लाडू

Subscribe

मेथीचे लाडू रेसिपी

हिवाळा सुरू झाला की, थंडीत गरम पदार्थांचे सेवन केले जाते. अशावेळी गृहिणींची विविध प्रकाचे लाडू करण्याची लगबगही सुरू होते. अशावेळी उष्ण गुणात्मक, शरीरात आणि त्वचेच्या ठिकाणी स्निग्धता निर्माण करणारे, तसेच कफनाशक आणि वातनाशक पदार्थ पोटात गेलेले चांगले असतात. त्यामुळे हे गुणधर्म देणारे पदार्थ या दिवसांत लाडू वा चिक्कीसारख्या पदार्थामध्ये वापरता येतात. अशाच एका लाडूची आज आपण रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य

- Advertisement -

५० ग्रॅम मेथी पावडर
२ वाट्या गव्हाचे पिठ (कणिक)
१ वाटी किसलेले सुके खोबरे
१ वाटी खारीक पावडर
५० ग्रॅम डिंक (ऑप्शनल)
५० ग्रॅम खसखस (कोरडी भाजावी व पावडर करावी)
अडीच वाट्या पिठी साखर
अडीच वाट्या तूप
बेदाणा काजूतुकडा इतर सुकामेवा
वेलची पूड

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम खसखस भाजून त्याची पावडर करून घ्यावी. त्यानंतर वरील दिलेल्या तुपातील १/२ वाटी तूप गरम करावे. त्यात मेथी पावडर किमान १२-१५ तास भिजवून ठेवावी. मग सुके खोबरे किसून भाजून घ्यावे आणि २ वाट्या तूप कढईत घालून त्यात डिंक तळून घ्यावा. डिंक बाजूला काढून उरलेल्या तुपात गव्हाचे पिठ खमंग भाजून घ्यावे. गॅस बंद करून त्यात भिजवलेली मेथी पावडर, खारीक पावडर, खसखस पावडर, किसून भाजलेले खोबरे, वेलची पूड, सुकामेवा, तळलेला डिंक, पिठीसाखर घालून मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू वळावे, अशाप्रकारे मेथीचे झटपट लाडू तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -