घरमुंबईरिक्षाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

रिक्षाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Subscribe

रिक्षाचालकाने दिलेल्या धडकेमध्ये एका दुचाकीस्वारा जागीच मृत्यू झाल्याची घटना सांताक्रूझच्या वाकोला परिसरात घडली आहे.

रिक्षाचालकाने दिलेल्या धडकेमध्ये एका दुचाकीस्वारा जागीच मृत्यू झाल्याची घटना सांताक्रूझच्या वाकोला परिसरात घडली आहे. रोहित घोसाळकर असे या तरुणाचे नाव असून या अपघातात रोहितचा मित्र ओमकार देवरुखकर (२५) थोडक्यात बचावला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस महामार्गांवरील सीसीटिव्हिच्या मदतीने आरोपी रिक्षा चालकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

नेमके काय घडले?

वडाळा येथे राहणारा रोहित घोसाळकर आपला मित्र ओमकार देवरुखकर याच्यासोबत मालाडला गेला होता. दोघेही फोटोग्राफर असल्यामुळे ते एका लग्नसमारंभाच्या शूटसाठी गेले होते. दरम्यान, लग्नसमारंभाहून दोघेही परतत असताना वाकोला उड्डाणपूलावर त्याच्या दुचाकीला एका रिक्षा चालकाने मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेमध्ये ओमकार हा उड्डाणपूलाहून खाली पडला. या घटनेमध्ये ओमकारला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तर या अपघातात रोहितचा जागीच मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कल्याण – डोंबिवली लोकल उद्या ५ तास बंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -