घरमहाराष्ट्रकांद्यापाठोपाठ लसूणही महागला!

कांद्यापाठोपाठ लसूणही महागला!

Subscribe

रोजच्या जेवणात भाजी, आमटीची चव वाढवण्यासाठी कांद्याप्रमाणेच लसूणही मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पण सर्वसामान्यांना आता लसूणही परवडेनासा झाला आहे.

कांदा सर्वसामान्यांना रडवत असताना आता लसणाचे भाव सुद्धा गगनाला भिडल्याचे चित्र आहे. मध्यप्रदेशमधून होणारी लणसाची आवक मंदावल्याने राज्यात लसूण महाग झाला आहे. त्यानुसार लसणाचे दर दोनशे रुपये तर गावठी लसूण तीनशे रुपयांवर पोहचला आहे. दरम्यान यंदा द्राक्षांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तेव्हा यंदा द्राक्षंसुद्धा महाग मिळण्याची शक्यता आहे.

…म्हणून लसूण महागला

रोजच्या जेवणात भाजी, आमटीची चव वाढवण्यासाठी कांद्याप्रमाणेच लसूणही मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पण सर्वसामान्यांना आता लसूणही परवडेनासा झाला आहे. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजारात मध्यप्रदेशमधून लसणाची आवक होते. यंदा आवक घटल्याने लसूण महाग झाला आहे. कांद्याचे दर वाढल्यानंतर सर्वसामान्यांच्या ताटातून कांदा गायब झाला. कांद्याचे भाव आटोकात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -

द्राक्षबागांचंही नुकसान

यंदा अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यांमध्ये द्राक्षबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. द्राक्षांच्या निर्यातीवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान यंदा द्राक्षांच्या किंमतीसुद्धा वाढू शकतात.

हेही वाचा – शेतकर्‍यांचे लक्ष शासनाच्या मदतीकडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -