घरमहाराष्ट्रपूल बांधणीच्या सरावादरम्यान पूल कोसळला; दोन जवानांचा मृत्यू

पूल बांधणीच्या सरावादरम्यान पूल कोसळला; दोन जवानांचा मृत्यू

Subscribe

गुरुवारी दुपारी दापोडी येथील मिलीटरी इंजिनियरींग कॉलेजमध्ये गुरुवारी पूल बांधणीच्या सरावाचे काम सुरु असताना अचानक पूल खाली कोसळला. या दुर्घटनेत दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला तर ९ जवान गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या जवानांमध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी जवानांपैकी काही जवानांना खडकी येथील मिलीटरी हॉस्पिटल आणि काहींना पुण्यातील कमांड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. लान्स हवालदार पी. के. संजीवनी, नायक बी.के. वाघमोडे अशी अपघात मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

युद्धाच्या काळात, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा एखाद्या दऱ्याखोऱ्यांच्या परिसरात, नदी ओलांडण्यासाठी लष्कराकडून पूल उभारले जाते. अशाप्रकारचे पूल उभारण्याची जबाबदारी लष्कराच्या इंजिनियरींग विभागाकडे असते. अशाच प्रकारचे पूल उभारण्याचा प्रशिक्षण दापोडी येथील मिलीटरी इंजिनियरींग कॉलेजमध्ये सुरु होते. या पुलाचे नाव बेली ब्रेजी असे होते. बांधकाम सुरु असताना पूलाखाली १० ते १२ जवान होते. या पुलाला आधार देणारा टॉवर अचानक हल्ल्यामुळे पूल खाली कोसळला. या दुर्घटनेत पी. के. संजीवनी आणि बी. के. वाघमोडे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर ९ जण जखमी झाले. पुलाच्या मलब्याखाली अडकलेल्या जवानांना तातडीने बाहेर काढण्याचे प्रयत्न केले गेले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी जवानांमधील काही जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यावर या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -