घरदेश-विदेशआदिवासी नृत्य महोत्सवात राहुल गांधींनी धरला ठेका!

आदिवासी नृत्य महोत्सवात राहुल गांधींनी धरला ठेका!

Subscribe

छत्तीसगड मधील रायपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय आदिवासी महोत्सवात राहुल गांधी यांनी आदिवासींसोबत नृत्य सादर केले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे त्यांच्या भाषणासाठी जेवढे प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे उत्तम नृत्य कौशल्य असल्याचे देखील एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. छत्तीसगड मधील रायपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय आदिवासी महोत्सवात राहुल गांधी यांनी आदिवासींसोबत नृत्य सादर केले. एवढेच नाही तर यावेळी त्यांनी ढोलासारखे असलेले पारंपरिक वाद्यही त्यांनी यावेळी वाजवले. दरम्यान राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान देशात सीएए आणि एनआरसी कायद्याला अनेक संघटना, विद्यार्थ्यांकडून विरोध होत आहे. काँग्रेसही या कायद्याविरोधात तीव्र आंदोलन करत आहे. याप्रश्नी राहुल गांधी हेसुद्धा आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. एवढेच नाही तर या कायद्यावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -