घरताज्या घडामोडीमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारतानाही बच्चू कडूंचा सामाजिक संदेश

मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारतानाही बच्चू कडूंचा सामाजिक संदेश

Subscribe

रक्त सांडणारी नाही तर रक्तदान करणारी औलाद असे नेहमी आपल्या भाषणात म्हणणारे आणि आपल्या प्रत्येक सामजिक कृतीची सुरुवात स्वतः रक्तदान करून करणाऱ्या बच्चूभाऊ कडू यांनी शालेय शिक्षण, कामगार, जलसंपदा लाभक्षेत्र, महिला व बाल विकास, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-जमाती या खात्यांचा राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकार करताना सामजिक भान जपले आहे. ज्या पवित्र मतदानाच्या माध्यमातून मी आमदार आणि मंत्री झालो, अशा पवित्र दानाच्या माध्यमातूनच रक्तदानाची पवित्र कृती करावी म्हणून रक्तदान करूनच मंत्रिपदाचा पदभार सांभाळणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. प्रहार जनशक्ती पक्षाच्या ५० कार्यकर्त्यांनी थॅलेसेमियाच्या रुग्णासाठी रक्तदान करून बच्चू कडू यांना मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या.

मंत्री झालो तरी आक्रमक स्टाईल

शेतकरी, अपंग, कष्टकरी बांधवांसाठी माझी काम करण्याची स्टाईल आक्रमक असणार अशीही भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली. मंत्रालय शेजारीच्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर त्यांनी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. शेवटी प्रहारच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत रक्तदानाची संस्कृती युवकामध्ये यावी असा संदेश दिला.

- Advertisement -

अपंग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी महिन्यातून एक दिवस महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर खुर्ची टाकून बसणार असल्याचेही बच्चू कडू यांनी आज जाहीर केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -