घरमहाराष्ट्रगरीब, गरजू नागरिकांनाच स्वच्छ, शुद्ध शिवभोजन द्या

गरीब, गरजू नागरिकांनाच स्वच्छ, शुद्ध शिवभोजन द्या

Subscribe

26 जानेवारी रोजी सुरू होणार्‍या शिवभोजन योजनेचा लाभ देताना स्वच्छता व शुद्ध जेवणाकडे लक्ष ठेवा. जनतेच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून गरीब व गरजू लोकांनाच शिवभोजनाचा लाभ देण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले. मंत्रालयात आज सर्व पुरवठा उपायुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या समवेत शिवभोजन योजनेच्या तयारीचा आढावा व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे घेण्यात आला त्यावेळी भुजबळ बोलत होते.

शिवभोजन योजनेचा लाभ प्रामाणिक गरीब व गरजू लोकांना पोहोचला पाहिजे.शिवभोजन योजनेची जास्तीत जास्त गरीब व गरजू लोकांना माहिती होण्यासाठी होर्डींग, बॅनर्स, पोस्टर्स, फ्लेक्स, माहिती फलक योग्य त्या ठिकाणी लावण्याची काळजी घ्यावी. शिवभोजन केंद्रात स्वतंत्र किचनची व्यवस्था असावी. किचनमध्ये अन्न पदार्थ तयार करताना स्वच्छतेचे सर्व निकष पाळणे बंधनकारक असेल. अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी स्टेन्लेस स्टीलची असावीत. अन्न पदार्थ तयार करताना फिल्टर पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा.

- Advertisement -

स्वच्छ टेबल, पोषक पदार्थ आणि गुणवत्ता राखून भोजन तयार करुन घ्यावे.तसेच यासाठी जिल्हा यंत्रणांनी यावर नियंत्रण ठेवावे असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले. यासाठी जिल्हा यंत्रणांनी सतर्कतेने काम केले पाहिजे. चांगल्या व प्रामाणिक सार्वजनिक संस्था आणि महिला बचत गट यांना शिवभोजन केंद्र सुरू करण्यास प्राधान्य द्यावे. भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल, भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहतील. त्यामुळे यावेळेस गर्दी होण्याची शक्यता असल्याने आवश्यकता भासेल तेथे पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी,असेही निर्देश भुजबळ यांनी दिले आहेत.

सरकारी कर्मचार्‍यांनी थाळी घेऊ नये

- Advertisement -

26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सरकारकडून 10 रुपयांत शिवभोजन थाळीचे उद्घाटन केले जाणार आहे. राज्यात 110 ठिकाणी दुपारी 12 ते 2 यावेळेत शिव थाळी दिली जाणार आहे. पण महत्वाचे म्हणजे सरकारी कर्मचार्‍यांनी हे शिवभोजन घेऊ नये, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ही थाळी गोर गरीबांसाठी केली आहे. पण लोकांच्या प्रामाणिकतेपणावर आम्ही सोडले असल्याचे मत भुजबळ यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -