घरताज्या घडामोडीकोल्हारजवळ शिवशाही बसला अपघात; ५ महिलांसह चालक जखमी

कोल्हारजवळ शिवशाही बसला अपघात; ५ महिलांसह चालक जखमी

Subscribe

कोल्हारजवळ शिवशाही बसला अपघात झाला असून या अपघातात पाच महिलांसह चालक जखमी झाला आहे.

सामान्य प्रवाशांना सुखकर, वातानुकुलित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी एस.टी. महामंडळाने अत्याधुनिक अशी शिवशाहीची बस आणली. मात्र या अत्याधुनिक अशा शिवशाही बसेसचे बऱ्याचदा अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. आजही शिवशाहीचा नगर मनमाड महामार्गावर कोल्हार येथील प्रवरा नदी पूलाजवळ शनी मंदिरासमोर शिवशाही बस आणि कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाच महिलांसह चालक जखमी झाला आहे. जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

असा घडला अपघात

सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कार नगरकडे जात होती. तर कोपरगाव – पुणे शिवशाही बस पुण्याकडे जात होती त्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात दार्जिलिंगला राहणारे अपर्णा अनिल लामा (२०), पार्वती चंद्रप्रकाश लामा (६४), पूमन अनिल लामा (४२), कांची देंढु डुबका (६५), नारीम उदय डुबका (५०) आणि निखील संजय अत्रे (२३) हे जखमी झाले आहेत.

- Advertisement -

कोपरगावहून पुण्याकडे जात असलेली शिवशाही बस कोल्हार येथील प्रवरा नदी पूलाजवळ आली असता शनी शिंगणापूरकडून शिर्डीकडे जात असलेल्या कारने बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेमुळे कारचे मोठे नुकसान झाले असून बसच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चकाचूक झाला आहे. दरम्यान, या बसमध्ये आसामधील साईभक्त महिला प्रवास करत होत्या. तर कारमधून प्रवास करणाऱ्या महिलांना देखील मोठ्या प्रमाणात डोक्याला मार लागला असून त्यांना जवळील रुग्णालयात उपचारा करता दाखल केले आहे. तसेच अपघातातील कार शिर्डीतील असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – नाशिकमध्ये बस-रिक्षाचा अपघात; दोन्ही वाहन विहिरीत कोसळून ७ मृत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -