घरताज्या घडामोडीमहाविकासआघाडीसमोर भाजप पुन्हा पराभूत!

महाविकासआघाडीसमोर भाजप पुन्हा पराभूत!

Subscribe

राज्यात शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य निवडणुका असोत किंवा कुठल्या पोटनिवडणुका, महाविकासआघाडी आणि भाजप यांच्यात थेट लढत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यवतमाळ विधानपरिषदेच्या जागेसंदर्भात देखील हेच चित्र पाहायला मिळालं. शिवसेनेचे तानाजी सावंत यवतमाळमधून विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे यवतमाळमधून रिकाम्या झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महाविकासआघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी भाजपच्या सुमित बाजोरिया यांचा पराभव केला आहे.

Dushyant Chaturvedi

- Advertisement -

यवतमाळ जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपरिषदा, नगर पंचायतींचे सदस्य आणि एकूण १६ पंचायत समित्यांचे सभापती असे एकूण ४८९ मतदार या निवडणुकीत मतदान करणार होते. यामध्ये दुष्यंक चतुर्वेदी यांना २९८ मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार सुमित बजोरिया यांना १८५ मतं मिळाली. ६ मतं अवैध ठरवण्यात आली.

वास्तविक या निवडणुकीत महाविकासआघाडी आणि भाजप यांच्याशिवाय इतर ४ अपक्ष उमेदवार देखील रिंगणात होते. मात्र, त्यांनी नंतर माघार घेतल्यामुळे अपेक्षेप्रमाणेच महाविकासआघाडी विरूद्ध भाजप अशी थेट लढत यावेळी पाहायला मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -