घरट्रेंडिंगयाने राज ठाकरेंना दिली वडापावची 'लाच'!

याने राज ठाकरेंना दिली वडापावची ‘लाच’!

Subscribe

कुणाल कामरा हे तरूणांमध्ये खूप फेमस आहे. कुणालचा ‘शट अप या कुणाल’ हा शो खूप लोकप्रिय आहे. त्याच्या सोशल मीडियावर कटेंटमुळे कायम तो चर्चेत असतो. त्याच्या प्रत्येक पोस्टची नेटीझन्स वाट बघत असतात. सध्या कुणालची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चक्क वडापावचे अमिष दाखवले आहे. त्यामुळे कुणाल कामराची आता वडापावमुळे चर्चा सुरू आहे. कुणालने चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वडापावची ‘लाच’ देत आपल्या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी विनंती केली आहे.

- Advertisement -

‘शट अप या कुणाल’ या शोमध्ये यामध्ये कुणाल वेगवेगळ्या व्यक्तींसोबत संवाद साधतो. कुणालने आतापर्यंत, पत्रकार रविश कुमार, जावेद अख्तर, योगेंद्र यादव, कन्हैय्याकुमार आदींनी हजेरी लावली आहे. आता कुणालने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आमंत्रित केले आहे.

- Advertisement -

कुणालने राज यांना एक पत्र लिहीले आहे. त्यात म्हटले आहे की, माझा अभ्यास पूर्ण झाला आहे. तुम्हाला किर्ती महाविद्यालयाजवळील वडापाव आवडतो. मी तुम्हाला लाच म्हणून वडापाव आणला आहे. किमान आता तरी तुम्ही माझ्या कार्यक्रमात येण्यासाठी वेळ द्यावी.

कुणाल कामराने पत्र आणि राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. कुणालच्या या कल्पक आमंत्रणावर नेटिझन्सने कुणालची वाहवा केली आहे. आता राज ठाकरे हे आमंत्रण स्विकारतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -