घरट्रेंडिंगहा पुणेकर म्हणतो, 'मी जगातला डेंजर माणूस'!

हा पुणेकर म्हणतो, ‘मी जगातला डेंजर माणूस’!

Subscribe

पुणेकर आणि त्यांच पुणेरी बोलणं जगजाहीर आहे. त्यातच पुणेरी पाट्या हे केवळ पुण्याच्या नाही तर जगभर प्रसिद्ध झाल्या आहेत. यावरून अनेक जोक्स नेहमीच व्हायरल होत असतात. पुणेकरांसारखं खोचक बोलणं प्रत्येकाला जमतच असं नाही. पुण्यात गेलात तर पुणेरी बोलण्याचा वेळोवेळी प्रत्यय तुम्हाला येतो. मग ते एखाद्या दुकानातलं घडलेला संवाद असो की एखाद्या ऑफिसमधील तो संवाद पुण्यातच घडलाय हे आपण सगेचच ओळखू शकतो. असच एका पुण्यातील बँकेला ग्राहकांने लिहीलेल पत्र सोश मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

या पत्रात ग्रहाकाने बँकेला धमकी वजा पत्र लिहील आहे. या पत्रात लिहीलं आहे की, मॅनेजर साहेब, आपल्या बॅँकेतील लोक कर्मचारी कसे आहेत ते मला पूर्वी पासून माहिती आहे. तरी माझे वय ४३ असून आताच मी २२ वर्षी मूलीबरोबर लग्न केले आहे. तरी मला काका म्हणून माझा अपमान करू नये. नाहीतर मी जेव्हा अपमान करेल तेव्हा बघा..जगातील सर्वात डेंजर मनुष्य आहे मी.

- Advertisement -

या पत्रातून या इसमाना बॅँकेतील कर्मचाऱ्याने काका म्हटले आहे असं समजतय. ‘काका’ म्हटल्यामुळे तो मनुष्य भयंकर चिडला आणि रागात त्याने बँकेला असं पत्र लिहीलं आहे. आता बँकेत काका म्हटल्यामुळे बँकेला आलेलं कदाचीत हे पहिलचं पत्र असावं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -