घरमुंबईपालिकेला साचलेले पाणी दिसेना, कोर्टात केला अजब दावा

पालिकेला साचलेले पाणी दिसेना, कोर्टात केला अजब दावा

Subscribe

मुंबई शहरातील प्लास्टिक बंदी नंतर मुंबईत पाणी तुंबणे कमी झाल्याचा दावा मुंबई महानगर पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. मुंबई शहरात यंदा पाऊस जास्त झाला असला तरी पाणी कमी प्रमाणात तुंबल्याचे न्यायालयात आज पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

पावसाळा सुरु झाला कि मुंबईत पाणी साचणार नाही अस शक्यतो होत नाही. सलग पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत कित्येक भागात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. यामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. यंदाच्या चालू असलेल्या पावसाळ्या दरम्यानसुद्धा मुंबईची तुंबई झाली होती. मुंबईतील दादर, हिंदमाता, कुर्ला, सायन येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गेल्यावर्षी पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून डॉ. दिपक अमरापुरकर यांचा मृत्यू झाला होता. यानंतर पालिकेच्या गलथान कारभाराला जबाबदार ठरवण्यात आले होते. याचसंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात असलेल्या रस्त्यावरील मॅनहोल संदर्भातील याचिकेच्या सुनावणी दरम्यान मुंबई महानगरपालिकेकडून आज अजब दावा करण्यात आला आहे.

यंदाच्या पावसाळ्या दरम्यान मुंबई शहरातील प्लास्टिक बंदी नंतर मुंबईत पाणी तुंबणे कमी झाल्याचा दावा मुंबई महानगर पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. मुंबई शहरात यंदा पाऊस जास्त झाला असला तरी पाणी कमी प्रमाणात तुंबल्याचे न्यायालयात आज पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुंबई शहरात पावसाळ्यात ठिकठिकाणी जमा होणारे पाणी आणि त्यामुळे महानगर पालिकेकडून केली जाणारी उपाययोजना याबद्दल नेहमीच ओरड असते. मात्र एक वर्षापूर्वी प्रसिद्ध डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या रस्त्यावरील उघड्या मेनहोल्सवर संरक्षक जाळी बसवण्या संदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावाणी दरम्यान आज मुंबई महानगर पालिकेच्यावतीने आपली बाजू मांडण्यात आली.

मुंबईत सगळ्या मॅनहोल्सवर जाळ्या

डॉ. अमरापूरकर यांच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असे मुंबई महानगर पालिकेकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे. त्या बरोबरच कुलाबा ते सायन या भागात जिथे पावसाचं पाणी जमा होते त्या भागातील मॅनहोल्सवर लोखंडी संरक्षक जाळ्या बसवल्या आहेत, अशी माहिती पालिकेने कोर्टाला आज दिली. शहरात २५ ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवल्या असून पावसाचे पाणी तुंबू नये याकरता बीएमसीकडे वॉटर पंप असून मुंबई शहरात बीएमसीचे ६ पंपिंग स्टेशन्स आहेत, असे मागच्या सुनावणीत महानगर पालिकेने न्यायालयात सांगितले होते.

- Advertisement -

पालिकेला तुंबलेले पाणी दिसले नाही 

दरम्यान, महानगरपालिकेकडून केलेल्या या अजब दाव्यामुळे मुंबईत पाणी तुंबल्याचा प्रकार महानगरपालिकेला दिसत नाही का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. आठवड्याभरापुर्वी मुंबईत बरसलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईच्या कित्येक भागात पाणी साचूनसुद्धा आज पालिकेतर्फे पाणी साचण्याचे प्रकार कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -