घरताज्या घडामोडीनवरा-बायकोच्या भांडणात मुलाचा मृत्यू

नवरा-बायकोच्या भांडणात मुलाचा मृत्यू

Subscribe

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला बॅटने मारहाण करत असताना पाच वर्षाचा मुलगा मध्ये आला असता त्याच्या डोक्यात बॅट लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. आर्यन भीमराव खंडारे असे मृताचे नाव आहे.

पोलीसांच्या माहितीनुसार, भीमराव श्रावण खंडारे (२७, रा. विराजनगर, गॅलेक्सी स्कुल समोर जेलरोड दसक) याचे ३१ जानेवारी रोजी सांयकाळी ६ वाजता चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीसोबत भांडण झाले. त्याने पत्नीला लाकडी बॅटने मारहाण सुरु केली. पत्नीने आरडाओरड केल्याने त्यांचा मुलगा आर्यन जवळ आला. भीमरावने आर्यनच्याही डोक्यात बॅटने मारले. त्यात तो खाली पडला व हातपाय खोडू लागला. ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. त्यांनी भांडण सोडवले व आर्यनला उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्यात गंभीर जखम झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारास तो प्रतिसाद मिळत नसल्याने २ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. ५ फेब्रुवारी रोजी डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. भीमराव हा मोलमजूरी करत असून तो मुळचा आशेगाव (जि. वाशिम) येथील आहेत. २७ जानेवारी रोजी पत्नी माहेरी मालसेलू(परभणी) येथुन परत आली होती. पत्नीने उपनगर पोलिसांत पतीविरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -