घरमुंबईशिवभोजन थाळीला आता दीनदयाळ थाळीची टक्कर

शिवभोजन थाळीला आता दीनदयाळ थाळीची टक्कर

Subscribe

शिवसेनेच्या महत्त्वाकांशी अशा शिवभोजन थाळीला आता भाजपची दीनदयाळ थाळी टक्कर देणार असून, लवकरच ही थाळी सुरू होणार आहे. भाजपसोबत जोडलेल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून ही दीनदयाळ थाळी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जरी ही थाळी १० रुपयांत नसली तरी या ३० रुपयांच्या थाळीमध्ये १० पदार्थ देण्यात येणार आहेत.
११ फेब्रुवारीपासून दीनदयाळ थाळी

दरम्यान ही थाळी ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे पहिली ही थाळी सुरू करण्यात येणार आहे. सरकारकडून देण्यात येणार्‍या शिवभोजन थाळीमध्ये १० रुपयामध्ये भात, भाजी, वरण आणि पोळी असे चार पदार्थ दिले जातात. मात्र दीन दयाळ थाळीमध्ये तीन चपात्या, डाळ, भात, भाजी, चटणी, पापड, लोणचे, कांदा लींबू याचा आस्वाद घेता येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान भाजपकडून सुरू करण्यात येणार्‍या दिनदयाळ थाळीची सुरुवात ही तिर्थ क्षेत्र असलेल्या पंढरपूर येथून सुरु करण्यात येणार असून, पंढपूरयेथे येणार्‍या भाविकांची संख्या जास्त असते. या भाविकांना कमी दरात आणि चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे म्हणून या थाळीची सुरुवात पंढरपूर येथून करण्यात येणार असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले. दरम्यान यानंतर संपूर्ण राज्यात देखील ही दीनदयाळ थाळी सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -