घरमुंबईइंदुरीकर महाराजांविरोधात होणार गुन्हा दाखल

इंदुरीकर महाराजांविरोधात होणार गुन्हा दाखल

Subscribe

पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत नोटीस

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असे विधान करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून घेण्यात आला आहे. गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22चे उल्लंघन केल्याप्रकरणी इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांच्या भोवती कायद्याचे फास आवळले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘आपलं महानगर’ने या संदर्भातील बातमी प्रकाशित केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या झालेल्या प्रत्येक कीर्तनाचा व्हिडिओ हा ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या यूट्यूब चॅनेलद्वारे ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येतात.

nivrutti indurikar maharaj
इंदुरीकर महाराज

हे वाचा – Video: संभाजी भिडेंच्या वाटेवर इंदुरीकर महाराज; कीर्तनातून दिला पुत्रप्राप्तीचा संदेश

- Advertisement -

४ जानेवारीला यूट्युब चॅनेलवर अपलोड केलेल्या त्यांच्या कीर्तनाच्या व्हिडिओमध्ये त्यांनी ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होतात, असे विधान केले होते. या संदर्भात ‘आपलं महानगर’ने ‘अयऽऽ इंदुरीकर महाराजांनी सांगितला लिंगनिदानाचा टायमिंग फॉर्म्यूला’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल अहमदनगरमधील पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आली. या बैठकीमध्ये इंदुरीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार इंदुरीकर महाराज यांना नोटीसही पाठवून पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सल्लागार समितीकडून घेण्यात आला आहे. तसेच इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याबाबत पुरावे जमा करण्याचा निर्णयही समितीकडून घेण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात अधिक पुरावे जमा करण्याचा निर्णयही समितीकडून घेण्यात आल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित अधिकारी प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.

सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. पुरावे कोणी सादर केल्यास तातडीने गुन्हा दाखल करण्यात येईल. – प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित अधिकारी, अहमदनगर

- Advertisement -

संभाजी भिडे यांच्यानंतर प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर यांनीही केले पुत्रप्राप्तीबद्दल धक्कादायक वक्तव्य… (Video Courtesy – मराठी किर्तन STUDIO)

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 3, 2020

 

पीसीपीएनडीटी कायद्याचे कलम २२ काय म्हणतो

पीसीपीएनडीटी कायदा कलम २२ अंतर्गत गर्भलिंग निदान निवडीबाबत जाहिरातीस बंदी आहे. छापील पत्रक, संवाद अगर एसएमस, फोन, इंटरनेटद्वारे गर्भलिंग निदान आणि निवडीची जहिरात करण्यास बंदी आहे. कलम २२(३), कलम २२ चा भंग झाल्यास संबंधितास तीन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -