घरताज्या घडामोडीतुकाराम मुंढेंची धाड थेट डम्पिंग ग्राऊंडवर

तुकाराम मुंढेंची धाड थेट डम्पिंग ग्राऊंडवर

Subscribe

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढें यांनी भांडेवाडी येथील डंपिंग यार्डवर धाड टाकली आहे.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढें यांनी आपल्या कामाचा सकाळी सकाळीच धडाका लावला आहे. त्यांनी आज आपली धाड भांडेवाडी येथील डंपिंग यार्डवर टाकली. कचरा आणि त्यात होणाऱ्या अनियमिततेची माहिती घेत ओला आणि सुक्या कचऱ्याचा एकच ढीग रचला असल्याचे पाहून ते संतापले. त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे. यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ताकीदही त्यांनी दिली. या दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला.

मास्क न घालताच मुंढेंची डम्पिंग ग्राऊंडवर धाड

त्याठिकाणी त्यांनी पाहणी करून तेथील बायो मायनिंग कचरा प्रक्रिया प्रकल्पाची माहिती घेतली. हजारो टन कचरा असलेल्या डेपोत जिथे मास्क घातल्याशिवाय जायला कोणीही धजावत नाही, तिथल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर तुकाराम मुंढे थेट मास्क न घालताच आले होते. तसेच तुकाराम मुंढे यांनी दोन तासापेक्षा जास्त वेळ भांडेवाडी कचरा डेपोची पाहणी केली. नागरीकांकडून कचरा वेगवेगळाच संकलित करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसा आग्रह त्यांच्याकडे धरावा. नागरीक तसे करीत नसतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

- Advertisement -

अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन

शहरातील कचरा संकलनाबाबत अनेक जणांच्या तक्रारी होत्या. कचरा गोळा करणारे कंत्राटदार कचऱ्याचं वजन जास्त दाखवून, महापालिकेकडून जास्त पैसे घेत असल्याचीही नागरिकांची तक्रार होती. त्यामुळेच पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांतच कचरा डेपोवर धाड टाकली. नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढें यांच्या बदलीनंतर कर्मचाऱ्यांच्या कामातील शिस्तीत वाढ झाली आहे. कर्मचारी वेळ पाळू लागले आहेत. तसेच सूचनांचे पालन न करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांचे निलंबन ही करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -