घरमनोरंजन'अम्मा देख' गाण्याला 'नवाबजादे'मध्ये नवा तडका

‘अम्मा देख’ गाण्याला ‘नवाबजादे’मध्ये नवा तडका

Subscribe

'अम्मा देख तेरा मुंडा बिगडा जाये' या गाण्याला एक वेगळाचं रॅपचा तडका लावण्यात आला आहे. १९९४ मध्ये जॅकी श्रॉफवर चित्रीत झालेलं हे गाणं त्याकाळी बरंच प्रसिद्ध झालं होतं.

धर्मेश येलांडे, राघव जुयाल आणि पुनीत जे. पाठक यांचा ‘नवाबजादे’ सध्या चर्चेत आहे. २७ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील आधी रिलीज झालेली गाणी गाजत आहेत. त्यात आता नवं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘अम्मा देख तेरा मुंडा बिगडा जाये’ या गाण्याला एक वेगळाचं रॅपचा तडका लावण्यात आला आहे. १९९४ मध्ये जॅकी श्रॉफवर चित्रीत झालेलं हे गाणं त्याकाळी बरंच प्रसिद्ध झालं होतं. १४ वर्षानंतर पुन्हा एकदा रिमेक होऊन प्रेक्षकांसाठी परत आणण्यात आलं आहे. पण यावेळी त्याची चाल पूर्ण बदलण्यात आली असून त्याचं चित्रीकरणही संपूर्णतः वेगळं आहे.

राघव, पुनीत, धर्मेश आणि शक्ती पुन्हा एकत्र

पुन्हा एकदा राघव जुयाल, पुनीत जे. पाठक, धर्मेश येलांडे आणि शक्ती मोहन ही चौकडी एकत्र आली आहे. या गाण्यात ही चौकडी धमाल करताना दिसत आहे. शक्तीनं शिमरिंग सालसा ड्रेसमध्ये तिघांबरोबर या गाण्यात केमिस्ट्री दाखवून दिली आहे. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे या गाण्यात रॅपिंग करण्यात आलं आहे. गुरिंदर सैगल ऊर्फ सरदारजी आणि सुकृती कक्कर यांनी हे गाणं गायलं असून सरदारजीनंच या गाण्याला संगीत दिलं आहे. तर रॅपिंग इक्कानं केलं आहे. जयेश प्रधाननं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून रेमो डिसुझानं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यापूर्वी आलेली ‘हाय रेटेड गबरू’ आणि ‘तेरे नाल नचणा’ ही दोन्ही गाणी सुपरहिट ठरली असून या नव्या गाण्याला कमी कालावधीत ४५ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून सध्या हे गाणं ट्रेंडिंगमध्ये आहे. दरम्यान चित्रपटातील हिरॉईन ईशा रिखीदेखील या गाण्यामध्ये दिसून येते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -